हुस्नापुर येथे चोरट्यांचा धुमाकूळ, चोरट्यांनी चिमुकलीवर उगावला सुरा
क्राईम प्रतिनिधी/ देवळी:
देवळी तालुक्यातील हुस्नापुर गावात तीन दिवसांपासून चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून गावांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे गावकरी रात्रीचे गस्त घालत आहे गावकऱ्यांनी घातलेल्या ग्रस्थामुळे शाळेच्या आवारामध्ये चोर बस्तान करून होते
शाळा उघडताच विद्यार्थिनीला चोर दिसल्यामुळे विद्यार्थिनीवर चोरट्यांनी सुरा उगारला विद्यार्थिनीने जोराने चोर चोर असा आवाज केल्याने चोरट्यांनी पलायन केले
राष्ट्रीय महामार्गालगत हुस्नापुर हे गाव असून दोनशे ते अडीचशे लोकवस्तीच्या या गावामध्ये सर्व रोजमजुरी व शेतकरी वर्ग वास्तव्य करतात
गावात एक जानेवारीच्या रात्री बारा वाजता च्या सुमारास दिलीप वाहारे यांच्या घरी चोरी करून 50 हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला होता तसेच सुधाकर वाघमारे यांच्या घरी सर्व कुटुंब लग्नकार्याला गेलो असता त्यांच्या घरातील कपाट फोडून सामानावर चोरट्यांनी हात साफ केला होता
याबाबत गावात दहशत पसरली आहे 3 जानेवारी ला चार ते पाच व्यक्ती गावात रात्रीला आढळून आले असता गावकऱ्यांनी त्याचा पाठलाग केला असता रात्रीच्या अंधाराचा आधार घेत चोरट्यांनी जिल्हा परिषद शाळेच्या आवारात स्वच्छालयाचा आधार घेत चोर स्वच्छालयात दडून बसले
ग्रामस्थांनी सर्वत्र शोधाशोध घेतली परंतु चोरट्यांचा पत्ता लागला नव्हता
आज 4 जानेवारी रोजी शाळा उघडताच शाळेच्या विद्यार्थि
तनु गणेश वाहारे कार्तिक तोडासे नयन महाजन हे वर्गातील विद्यार्थी सफाईचे काम करत होते त्याच वेळी शाळेतून शौचालयाच्या पाठीमागून पाच व्यक्ती तोंडाला बांधून काळे कपडे घातलेले तनु वहारे या विद्यार्थीनी जवळ येऊन चॉकलेट घे व खा असे सांगितल्यावर तो तिने चॉकलेट घेण्यास नकार दिला व तुम्ही चोर आहे असे म्हणताच चोरट्यांनी तनुवर सुरा उगारला
तनु शाळेच्या खोलीकडे पळ काढत असताना चोरट्यांनी सुरा तिला फेकून मारला सुदैवाने सुरा चिमुकल्याला लागला नाही तिने त्वरित खोलीचे दार बंद करून चोर चोर असे जोरजोरात ओरडण्यात सुरुवात केली
त्यावेळी तिथे काही महिला व पुरुष जमा होताच चोरट्यांनी शाळेच्या भिंतीवरून एका शेताकडे पलायन केले तोपर्यंत गावातील काही युवक चोरट्यांच्या शोधात निघाले त्यांचा सर्वत्र शोध घेतला
पण त्यांच्या काही अंतरावर दुचाकी उभ्या होत्या त्यावर चोर प्रसार झाल्याचे परिसरातील नागरिक सांगत आहे
या घटने मध्ये चिमुकलीने दाखवलेल्या धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे पोलिसांनी लवकरात लवकर या चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकरी करीत आहेत