लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव प्रबोधनकराच्या यादीतून डावलणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा – शिवसेनेची मागणी
प्रतिनिधी / देवळी :
६ जानेवारी रोजी, साहित्य रत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे नाव प्रबोधनकराच्या यादीतून वगळण्याचे काम केंद्राच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर समितीच्या अधिकाऱ्यांनी केलं.जगत विख्यात साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांनी आपल्या संपूर्ण आयुष्यात दलित शोषित व बहुजनांच्या व्यथा व वेदनांना आपल्या साहित्यातून वाचा फोडली .त्यांच्या अजरामर व अनमोल साहित्यातून सयुंक्त महाराष्ट्र व देश स्वातंत्र्याच्या लढ्याला यश मिळाले. हे सर्व विसरून या समितीच्या अधिकाऱ्यांनी लोकशाहीर हे प्रसिद्ध नसल्याचा दावा करीत त्यांना प्रबोधनकरांच्या यादीतून डावलन्याचे काम त्यांनी केले.
हाच विषय लक्षात घेत अजिंक्य तांभेकर यांनी हा सर्व झालेला प्रकार आपल्या मराठी माणसाचा व लोकशाहीर साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांचा अपमान असून त्वरित या समिती मधील अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात यावे अशी भूमिका घेत,निवेदन तहसीलदार देवळी यांना देण्यात आले.
निवेदन देताना, शिव सेनेचे अमोल गायकवाड, निलेश तिकडे, निलेश मोटघरे,श्रीकांत पवार,अंकित वैद्य
हर्षल कैकाडी,सुरज शहा उपस्थित होते .