अपयशाच्या मालिकेनंतरही न डगमगता यश मिळवणारा सोनोरा (ढोक)चा सुपुत्र…

0

🔥अपयशाच्या मालिकेनंतरही न डगमगता यश मिळवणारा सोनोरा (ढोक)चा सुपुत्र.

देवळी -/ वर्धा जिल्हातील  सोनोरा ढोक गावातील रहिवासी अक्षय गणेश पाचखंडे यांनी अपयशाची सलग मालिका, आर्थिक अडचणी आणि मानसिक तणाव यांचा सामना करत अखेर भारतीय रेल्वेमध्ये लोको पायलट म्हणून यश संपादन केले आहे. त्यांची ही यशोगाथा परिसरातील तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.अक्षय यांनी २०१९ पासून स्पर्धा परीक्षांचा अभ्यास* सुरू केला. मात्र सातत्याने आलेल्या अपयशांमुळे त्यांच्यावर मानसिक दबाव वाढत गेला. सलग अपयशाच्या काळात कुटुंबावर आर्थिक भार पडू नये, तसेच स्वतःला उभे करण्यासाठी त्यांनी २०२३ मध्ये नागपूर मेट्रोमध्ये नोकरी स्वीकारली अपयशाच्या मालिकेमुळे त्यांनी ही नोकरी थोड्या आक्रमक निर्णयातून स्वीकारली, मात्र तीच नोकरी पुढील यशासाठी आधार ठरली.

नागपूर मेट्रोमध्ये काम करत असतानाही अक्षय यांनी आपले अंतिम ध्येय सोडले नाही. कष्टाचे ड्युटी शेड्युल, मानसिक थकवा आणि मर्यादित वेळ असूनही त्यांनी पहाटे व रात्री अभ्यास सुरूच ठेवला. अनेकदा अपयश जवळून पाहिल्यानंतरही त्यांनी हार मानली नाही. नोकरीसोबत अभ्यास करण्याचा हा संघर्ष अत्यंत कठीण असतानाही त्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला.

या सातत्यपूर्ण मेहनतीचे फळ म्हणून अखेर अक्षय यांची भारतीय रेल्वेमध्ये लोको पायलट पदासाठी निवड*
झाली. साध्या ग्रामीण पार्श्वभूमीतून आलेल्या अक्षय यांचे यश हे स्पष्टपणे दाखवते की *अपयश तात्पुरते असते, जिद्द आणि संयम असला की यश निश्चित मिळते

त्यांच्या या यशाबद्दल कुटुंबीय, ग्रामस्थ, मित्रपरिवार व सहकारी वर्गाकडून अभिनंदनाचा वर्षाव होत असून, त्यांच्या पुढील सेवेसाठी व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या जात आहेत.

राजू वाटाणे साहसिक News-/24 भिडी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!