आर्वी -/सदैव प्रवाशांच्या दिमतीला धावणाऱ्या एसटीमहामंडळाने आता बसस्थानकांच्या स्वच्छतेसाठी कंबर कसली आहे.वर्धा जिल्ह्यातील एसटीमहामंडळाच्या बसस्थानकांच्या संपूर्ण आवारात, तसेच प्रशासकीय इमारतीमध्ये आता दर १५ दिवसांनी विशेष स्वछता मोहीम राबविण्यात येणार आहे.यामुळे जिल्ह्यातील बसस्थानकांचा चेहरामोहरा बदलणार असुन प्रवाशांना स्वच्छ आणि प्रसन्न वातावरणात प्रवास करता येणार आहे. एसटीमहामंडळाच्या या उपक्रमात केवळ कर्मचारी नव्हे तर स्थानिक स्वराज्य संस्था, सामाजिक संस्था आणि नागरिकांचाही हिरारीने सहभाग घेतला जाणार आहे. स्वच्छतेचा हा वर्धा पँटर्न अधिक प्रभावी करण्यासाठी एसटीमहामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी प्रभावी आणि सुक्ष्म नियोजन केले आहे. केवळ मुख्य स्थानके नव्हे तर ग्रामीण भागातील बसथांबेही या मोहिमेत स्वच्छ केले जाणार आहे. खासगी प्रवासी वाहनासोबत एसटीला स्पर्धा करायची आहेत, त्यामुळे बसस्थानकासोबतच एसटी वाहनातही स्वच्छता पाळणे आवश्यक आहे. प्रत्येक फेरीनंतर बस आगारात नेऊन स्वच्छ केली जाते, काही तांत्रिक बिघाड असल्यास तो ताबडतोब दुरुस्त केला जातो. प्रवाशांना चांगल्या सेवेसोबतच बसस्थानकात स्वच्छता मिळावी यासाठी कटाक्षाने भर देण्यात येत आहे. तसेच एसटी प्रशासनाने घेतलेल्या निर्णयानुसार आता १५ दिवसांनी एकदा संपूर्ण बसस्थानक परिसरात महास्वच्छता अभियान राबविले जाईल. नियमित स्वच्छतेव्यतिरिक्त ही मोहीम राबवून कानाकोपऱ्यातील कचरा उपासण्यात येणार आहे. बसस्थानकातील फरशा, भिंती, खिडक्यांच्या काचा आणि महत्त्वाचे म्हणजे प्रवाशासाठी असलेली शौचालये रसायनांचा वापर करून लख्ख केली जाणार आहे. दुर्गंधीमुक्त बसस्थानक हे या मोहिमेचे आगळेवेगळे मुख्य उदिष्ट आहे. तसेच बसस्थानक परिसरात विनापरवाना लावलेले जाहिरातीचे जुने पोस्टर आणि बँनरमुळे विद्रुपीकरण होते, अशा सर्व बँनरची गर्दी हटवून बसस्थानकाचा परिसर मोकळा आणि सुंदर केला जाणार आहेत. .या— संपूर्ण मोहिमेची,अमलंबजावणी चोखपणे व्हावी, यासाठी विभागप्रमुख यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. स्वच्छतेचा अद्ययावत अहवाल आणि छायाचित्रे वरिष्ठ कार्यालयाला सादर करणे बंधनकारक असेल.. बसथांब्यापर्यत उपक्रम केवळ जिल्हा किंवा तालुकास्तरावरील मोठी स्थानके नव्हे तर ग्रामीण भागातील महत्त्वाचे बसथांबे जिथे प्रवाशांची मोठी वर्दळ असते, त्या ठिकाणीही मोहीम जोरदार पणे राबविण्यात येणार आहे. 🔥एसटीमहामंडळाचा हा उपक्रम कौतुकास्पद म्हणावा लागेल. या सामाजिक उपक्रमात शाळा, महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होणार असल्याने स्वच्छतेचे महत्त्व जोपासले जाईल, परंतु हा उपक्रम केवळ कागदावर न राबविता तो प्रत्यक्ष राबविल्यास बसस्थानक परिसरात घाणीचे साम्राज्य होणार, नाहीत याची काळजी घेतली पाहिजे, त्यासाठी या उपक्रमात लोकसभा घेणे, आवश्यक आहेत. प्रवाशांनी सुध्दा केवळ एसटीमहामंडळाच्या कारभारावर अवलंबून न राहता, आपले नैतिक कर्तव्य म्हणून स्वच्छता ठेवली पाहिजे, असे माझे प्राजंळ मत आहेत..(अविनाश ल.टाके सामाजिक कार्यकर्ते आर्वी) 🔥संकलित केलेल्या कचऱ्याची विल्हेवाट लावताना ओला आणि सुका कचरा असे वर्गीकरण केले जाणार असुन,तसेच स्थानिक नगरपरिषदेच्या मदतीने या कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली जाणार असल्याने बसस्थानके अधिक स्वच्छ दिसेल, त्यामुळे प्रवाशांना सुखकारक प्रवास उपभोगता येईल.(अरुण म.कहारे सेवानिवृत्त माध्यमिक शिक्षक आर्वी जिल्हा वर्धा.) 🔥महाराष्ट्रातील एसटीमहामंडळाचे अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम होत असतात, परंतु अपुरा आर्थिक निधी व लोकांच्या नकारात्मक प्रतिसादामुळे, अनेक सेवाभावी उपक्रम कालौघात बंद पडतात. अपुऱ्या नियोजनामुळे हे सेवाभावी उपक्रम भविष्यात बंद पडतात, ही शोकांतिका म्हणावी लागेल, त्यामुळे एसटीमहामंडळाच्या अधिकाऱ्यांनी आधी महामंडळाच्या ताफ्यात सुसज्ज प्रवासी बस उपलब्ध करून देणे गरजेचे आहेत, असे माझे प्राजंळ मत आहेत. (प्राध्यापक सुरेंद्र गोठाणे सामाजिक कार्यकर्ते आर्वी.)