🔥जामगांव येथील रस्त्याच्या कामात चोरीचा गौण खनिज, निकुस्ट दर्जाचे बांधकाम.🔥माजी उपसरपंच अंकित कावळे यांची कार्यकारी अभियंता यांच्या कडे चौकशी करून कार्यवाही ची मागणी
आष्टी शहीद -/ आष्टी तालुक्यातील माणिकवाडा ग्रामपंचायत च्या हद्दीत जामगांव येथे सुरु असलेले वादग्रस्त रस्त्याचे बांधकाम हे निकुस्ट दर्जाचे असून या कामात विना परवानगी गौण खनिज चोरून आणून रस्त्याच्या कामात वापरण्यात येत असल्यामुळे महसूल विभागाचा लाखो रुपयाचा महसूल बुडाला आहे. या गंभीर प्रकरणाची चौकशी व्हावी म्हणून जामगांव येथील उपसरपंच अंकित कावळे यांनी तक्रार केली आहे.
सविस्तर असे कि,
माणिकवाडा ग्रामपंचायत च्या हद्दीत असलेल्या जामगांव या गावात डी. पी. डी. सी. या हेड खाली तीस लाख रुपये चे बांधकाम होत आहे. सुरु असलेले बांधकामं हे अंदाज पत्रकाप्रमाणे होत नसून थातूर मातुर होत आहे. येथील काम करण्यासाठी कोणतीही रायल्टी न घेता व ज्या ठिकाणावरून मुरूम खोदण्यात येत आहे. ते ठिकाण शासकीय जमीन आहे. मुरूम वाहतूक करताना महसूल विभागाच्या सर्व परवानग्या घेऊन गौण खनिज उपसा करणे गरजेचे आहे. महसूल विभागाचे व वनविभागाचे सर्व नियम धाब्यावर बसवून रात्री ला गौण खनिज चोरून आणला जातो. या बाबीला तहसीलदार आष्टी यांची मुख संमती असल्याने उघडपणे महसूल मालमत्तेची चोरी होत असल्याचे दिसून येते. रस्त्याचे काम निकुस्ट दर्जाचे होत असताना उपसरपंच अंकित कवळे यांनी मुख्य अभियंता जिल्हा परिषद वर्धा यांना तक्रारी दिल्यावर घटना स्तळं पाहण्यासाठी श्री. दिवटे हे अभियंता व सोबत खरबडे हे सुद्धा आले होते. काम बोगस होत आहे अशी समज दिल्यावर ठेकेदार सुधरला नाही. पुन्हा त्याने काम सुरु केले. दोन दिवसापासून सुरु असलेले काम बोगस होत आहे म्हणून अधिकार्यांना कळविले आहे. कामात सुधारणा होत नाही म्हणून पुन्हा तक्रार करण्यातआली. गौण खनिज चोरून आणून काम करीत आहे. या घटनेची सुद्धा तक्रार महसूल विभागाला दिली आहे. चौकशी करून कार्यवाही होणार नसेल तर मोठे जण आंदोलन छेडणार असे कावळे यांनी म्हटले आहे. बोगस काम थांबवा अशी मागणी त्यांनी निवेदन देऊन केली.