🔥शिवसेना शिंदे हिंगणा तालुक्याच्या वतीने अजितदादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
हिंगणा -/महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री Ajit Pawar यांचे दिनांक २८ जानेवारी रोजी झालेल्या दुःखद निधनाने संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडाला आहे. त्यांच्या अकाली जाण्याने राज्याच्या राजकीय तसेच सामाजिक जीवनात मोठी व कधीही न भरून निघणारी पोकळी निर्माण झाली आहे.
या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे हिंगणा तालुक्याच्या वतीने शिवसेना मध्यवर्ती कार्यालय, वानाडोंगरी येथे दिनांक ३० जानेवारी २०२६, सायंकाळी ७ वाजता भावपूर्ण श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले. या सभेस हिंगणा तालुक्यातील शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या श्रद्धांजली कार्यक्रमास हिंगणा विधानसभा अध्यक्ष नरेश देवगडे, माजी हिंगणा विधानसभा अध्यक्ष डॉ. गुणवंत तपासे, उपतालुका प्रमुख प्रवीण बनकर, डिगडोह शहर प्रमुख नरेंद्र हटेले, उपशहर प्रमुख सुधीर यादव, तालुका संघटक गजेंद्र काकडे, हिंगणा शहर प्रमुख वासुदेव चर्डे, निलडोह नगर पंचायत अपक्ष नगरसेवक सुरेंद्र गौतम, प्रविण देशमुख तसेच असंख्य शिवसैनिक व नागरिक उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी दिवंगत नेत्याच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली.
यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख हिंगणा राजेंद्र गिरडकर यांनी अजितदादांच्या प्रदीर्घ राजकीय जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याचा गौरव केला. ते म्हणाले की, “अजितदादा पवार हे केवळ एक राजकीय नेते नव्हते, तर महाराष्ट्राच्या विकासप्रक्रियेतील एक ठाम आणि निर्णयक्षम नेतृत्व होते. शेती, सिंचन, पाणीपुरवठा, पायाभूत सुविधा व औद्योगिक विकास या क्षेत्रांत त्यांनी घेतलेले निर्णय आजही राज्याला दिशा देणारे आहेत. सामान्य माणसाच्या प्रश्नांसाठी ते कायम आग्रही राहिले.”
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, “विरोध असो वा सत्तेची जबाबदारी, अजितदादांनी कधीही कामाशी तडजोड केली नाही. त्यांचे स्पष्ट नेतृत्व, कठोर निर्णयक्षमता आणि जनहितासाठीची भूमिका कायम स्मरणात राहील.”
या श्रद्धांजली सभेत उपस्थितांनी दिवंगत नेत्याच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो, अशी प्रार्थना केली. कार्यक्रम शांततेत व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.