युवावर्गच विश्वग्राम साकार करू शकतात,समर्थ क्षीरसागर,राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन संपन्न…..

0

🔥युवावर्गच विश्वग्राम साकार करू शकतात,समर्थ क्षीरसागर.

🔥राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचे उद्घाटन संपन्न.

देवळी,रत्नापूर -/ देवळी तालुक्यातील रत्नापूर ‘गावाच्या विकास करायचा असेल तर योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. या नियोजनात युवावर्ग, सुजाण नागरिक व महिला यांचा समावेश करून विश्वग्राम संकल्पना साकार करता येऊ शकते. या दृष्टिकोनातूनच युवक युवतींवर जबाबदारी टाकल्यास युवा वर्गच विश्वग्राम साकार करू शकतात,असे प्रतिपादन रत्नापूर ग्राम येथे स्थानिक एस एस एन जे कनिष्ठ महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी तहसीलदार समर्थ क्षीरसागर यांनी 31 जानेवारी रोजी केले.

उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी तहसीलदार समर्थ क्षीरसागर तर उद्घाटक म्हणून सरपंच सुधीर बोबडे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून युवा नेते तथा उपसरपंच सौरभ कडू, माजी सरपंच सय्यद अयुब अली, विद्या ठाकरे, देविदास वाघ, ग्रामपंचायत अधिकारी अंकिता इसळ, पोलीस पाटील दीपिका वाघमारे, संतोष तुरक, गणेश शेंडे, प्राचार्य डॉ. सुनिता सोनारे, प्रा. जगदीश यावले, प्रा. मेघा फासगे व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी कॅप्टन मोहन गुजरकर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना श्रद्धांजली देऊन झाले. संत गाडगेबाबा, स्वामी विवेकानंद व शिक्षण महर्षी स्वर्गीय बापूरावजी देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.

सात दिवसीय शिबिरात विश्व ग्राम संकल्पना, बंधारा बांधणे, स्वच्छ ग्राम सुंदर ग्राम, पथनाट्यातून जनजागृती, महिला मेळावा, स्वयंरोजगार शिबिर व विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेश आहे.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कॅप्टन मोहन गुजरकर यांनी करून राष्ट्रीय सेवा योजना शिबिराचा उद्देश सांगितला. याप्रसंगी सरपंच सुधीर बोबडे म्हणाले सुजान युवक युवतींच्या मदतीने गावाचा विकास सहज शक्य आहे तर उपसरपंच सौरभ कडू म्हणाले गावाच्या उथ्थानात महिलांचा व युवा वर्गाचा सहभाग असल्यास सुंदर ग्राम ही संकल्पना सहज साकारता येते. ग्रामपंचायत अधिकारी अंकिता इसळ म्हणाल्या समाजसेवा हा संस्कार रुजविणे काळाची गरज आहे.

कार्यक्रमाचे संचालन सीनियर अंडर ऑफिसर कल्याणी लिखार व एनएसएस स्वयंसेविका आरती मरघडे यांनी तर आभार अंडर ऑफिसर रितेश बुटे यांनी मानले.

यशस्वीते करिता सुजल पराते, सौरभ साव, कोमल शितळे व राष्ट्रीय सेवा योजना स्वयंसेवक प्रयत्न करीत आहे.

             सागर झोरे                          साहसिक News-/24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!