🔥हीच तीआर्णी तालुक्यात रेती तस्करांचा धुमाकूळ..रस्ते उद्ध्वस्त, प्रशासन सुस्त..पत्रकारांना धमक्या दिल्याने संताप. 🔥हाच तो आर्नी येथील लाचखोर तहसीलदार वैशाख वाहुरवाग रेती चोरीची करतो दलाली.
आर्णी -/यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी तालुक्यात सध्या अवैध रेती तस्करीने सीमा ओलांडली असून, निसर्ग आणि लोकशाही या दोन्हीवर एकाच वेळी आघात होत असल्याचे विदारक चित्र समोर आले आहे. नवीन रेती तस्करांच्या वाढत्या संख्येमुळे तालुक्यातील शांतता भंग पावली असून, प्रशासनाचे याकडे असलेले ‘अर्थपूर्ण’ दुर्लक्ष आता नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत पाहत आहे.तालुक्यातील ग्रामीण भागातून रात्रभर धावणाऱ्या रेतीच्या अवजड वाहनांमुळे एकेकाळी सुस्थितीत असलेले रस्ते आता पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत. या रस्त्यांवर जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले असून, धुळीच्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मध्यरात्रीच्या सुमारास होणारी ही वाहतूक केवळ रस्त्यांचे नुकसान करत नाही, तर गावकऱ्यांची झोपही हिरावून घेत आहे. अनेक ठिकाणी नागरिक आणि तस्करांमध्ये बाचाबाचीचे प्रकार घडत असून, भविष्यात याचे रूपांतर मोठ्या संघर्षात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
रेती हा नदीचा नैसर्गिक गाळण घटक आहे. मात्र, आर्णी तालुक्यातील नद्यांच्या पात्रातून यंत्रांच्या साहाय्याने अवैध उपसा केल्यामुळे नदीपात्र खोल झाले आहे. यामुळे परिसरातील भूजल पातळी झपाट्याने खाली जात असून, उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. पर्यावरण तज्ज्ञांच्या मते, “नदीचे पोट फाडून मिळवलेली ही संपत्ती भविष्यात पर्यावरणाचा समतोल बिघडवणारी ठरेल.” निसर्गाशी सुरू असलेला हा खेळ थांबवण्याची मागणी पर्यावरणप्रेमी करत आहेत. नागरिकांचा थेट आरोप आहे की, महसूल विभागातील काही तलाठी, पोलीस कर्मचारी आणि वरिष्ठ अधिकारी यांचे रेती तस्करांशी साटेलोटे आहे. कारवाईचा फार्स करण्यासाठी आठवडाभरात एखादे वाहन पकडले जाते, मात्र काही वेळातच ‘वरिष्ठ स्तरावर’ चर्चा होऊन ते वाहन सोडून दिले जाते. कारवाईसाठी गेलेल्या प्रामाणिक कर्मचाऱ्यांवरही तस्कर हल्ले करण्यापर्यंत मजल मारत आहेत, तरीही प्रशासन गप्प का, असा सवाल उपस्थित होत आहे.
या सर्व प्रकरणात अत्यंत धक्कादायक बाब म्हणजे, या बेकायदेशीर धंद्याविरोधात आवाज उठवणारे पत्रकार झाकीर हुसैन यांना तस्करांकडून धमक्या देण्यात आल्या आहेत. “रेतीची बातमी का लावतो?” असा जाब विचारत त्यांच्यावर दबाव निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. भारतीय संविधानाच्या कलम १९ नुसार मिळालेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा हा गळा घोटण्याचा प्रकार आहे. जर सत्य मांडणाऱ्या पत्रकारांनाच संरक्षण नसेल, तर सर्वसामान्य जनतेने दाद कुणाकडे मागायची, हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे.
आर्णी तालुक्यातील ही स्थिती म्हणजे भविष्यातील मोठ्या संकटाची नांदी आहे. जर तातडीने कठोर पावले उचलली नाहीत, तर येथील नैसर्गिक साधनसंपत्ती कायमची नष्ट होईल. प्रशासनाने तात्काळ खालील पावले उचलणे गरजेचे आहे पत्रकारांना धमक्या देणाऱ्या गुंडांवर कठोर गुन्हे दाखल करणे.
भ्रष्टाचार करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करणे.
अन्यथा, “निसर्ग लुटला जाईल आणि लोकशाही गप्प केली जाईल,” हा नागरिकांचा इशारा प्रशासनासाठी धोक्याची घंटा ठरू शकतो.(क्रमशः)