आष्टी तालुक्यातील शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी सिंगल फेज द्यावा….

0

🔥शिवसेना शिंदे गटासह शेतकऱ्यांनी केली सिंगल फेजची मागणी.

साहुर -/ आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर जंगली भाग असुन या भागातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात जंगली जनावरांचा त्रास असल्याने शिवसेना शिंदे गटासह शेतकऱ्यांनी आष्टी येथील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी च्या कार्यालयात उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन देण्यात आले या निवेदनात असे म्हटले आहेत की शेतकऱ्यांना शेतीला पाणी पुरवठा करण्यासाठी दिवसा थ्री फेज विद्युत पुरवठा देत आहेत त्यामुळे शेतकरी समाधानी आहे परंतु रात्रीच्या वेळी शेतकऱ्यांना शेतात जागल करावी लागते त्यामुळे रात्री शेतात सिंगल फेज विद्युत पुरवठा असणे फार आवश्यक आहे तसेच लहान मोठे उद्योग सुरू करण्यासाठी सिंगल फेजची आवश्यकता आहे जर शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी सिंगल फेज विद्युत पुरवठा सुरू केला तर शेतकऱ्यांना याचा फार मोठा फायदा होणार आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी सिंगल फेज विद्युत पुरवठा सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली तसेच या भागात जंगली जनावरांचा मोठा हौदौस असून शेतातील पिके घरी आणण्यासाठी जागल केल्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही त्यामुळे 90% शेतकरी हे रात्रीची शेतात जागल करतात त्यामुळे जंगली जनावरांचा मोठा धोका असतो अशावेळी अंधारात जंगली जनावरे हमला करू शकतात त्यामुळे सर्व शेतकऱ्यांना सिंगल फेज ची अत्यंत आवश्यकता आहे म्हणून रात्रीच्या वेळीच सिंगल फेज शेतकऱ्यांना द्यावा जर निवेदनाची दखल घेतली नाही तर आंदोलन करून उपोषणाला बसणार असल्याचे मत शिवसेना शिंदे गटासह शेतकऱ्यांनी व्यक्त केले यावेळी शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे वर्धा लोकसभा संघटक रवी भाऊ बालपांडे जिल्हा प्रमुख प्रशांतभाऊ शाहागडकर उपजिल्हा प्रमुख दशरथजी जाधव तालुका प्रमुख चंद्रशेखर नेहारे उप तालुकाप्रमुख शरद वरकड शाखाप्रमुख विजय गावंडे उपशाखाप्रमुख प्रवीण मोहिते सचिव प्रफुल मुंदाने कोषाध्यक्ष प्रवीण धांदे सहसचिव शाम शिर्के , दिलीप मसराम,छगन ढोरे, प्रवीण दुधकवरे ,पांडुरंगजी हिवरे, नथ्थुजी चौधरी इत्यादी उपस्थित होते.

 शरद वरकड साहसिक News-/24 साहुर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!