🔥संत्रा मोसंबी पिकांची अनुदान बँकेत जमा झाले पण पैसे काढायचे कसे ?शेतकऱ्यांचा शासनाला प्रश्न?
साहुर,आष्टी -/ तालुक्यातील संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात फळगड झालेली होती उष्ण वातावरणाचा फटका शेतकऱ्यांना बसला आणि पाण्याचा खंड असल्याने संत्रा मोसंबी उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले होते त्या अनुषंगाने आमदार सुमित दादा वानखडे यांच्या प्रयत्नाने शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली आणि ती भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होत असून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळाला परंतु 90% शेतकऱ्यांचे खाते बँक ऑफ इंडिया च्या शाखेमध्ये बंद करण्यात आलेले आहेत एनपीए झालेल्या सर्व ग्राहकांना आपल्या स्वतःचा पैसा सुद्धा काढता येत नाही दुसऱ्याच्या खात्यावर ट्रान्सफर करून ग्राहक पैसे काढत होते परंतु ती सुविधा सुद्धा बँक ऑफ इंडिया च्या शाखेने बंद केलेली आहे त्यामुळे शासनामार्फत जे अनुदान मिळाले ते अनुदान म्हणजे शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसल्यासारखे झालेले आहेत पैसा खातात आला परंतु शेतकऱ्यांना तो काढता येत नसून शेतकऱ्यांचे मोठे हाल होत आहेत त्यामुळे लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे जर शेतकऱ्यांना अडचणीच्या वेळेस हा पैसा काढता आला नाही तर शेतकऱ्यांवर मोठे संकट आल्याशिवाय राहणार नाही म्हणून बँक ऑफ इंडियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एनपीए झालेले खाते सुरू करण्याची मागणी शेतकरी तसेच इतर ग्राहक करीत आहे त्यामुळे आमदार खासदार यांनी शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी आशा शेतकरी करीत आहे.