🔥बस फेरी येत नसल्याने सहा किलोमीटर विध्यार्थीयांची पायपीट.
🔥शासनाने मुलींना मोफत शिक्षण, मोफत पास मग घरापर्यंत लालपरी उपलब्ध होईल काय?
आष्टी शहीद -/ आष्टी तालुक्यातील बांबरडा गावातील शालेय मुलींना शाळेतून घरी जाण्यासाठी लालपरी उपलब्ध होत नसल्याने कडक उन्हात सहा किलोमीटर पायपीट करून घरी जावे लागते. शासनाने महिलांना शिक्षण क्षेत्रात पाऊल ठेवण्यासाठी वेगवेगळ्या शासकीय योजना अमलात आणल्या मात्र स्वातंत्र्य मिळून पंचायहात्तर वर्ष झाली तरी ग्रामीण भागात लालपरी वेळेवर पोहचत नसल्याने सहा किलोमीटर पायपीट करण्यात येत असल्याचा धाक्कदायक प्रकार पुढे आला.
आष्टी तालुका स्तळापासून पंधरा किलोमीटर अंतरावर घनदाट जंगलात बांबरडा हे गाव आहे. या गावात आदिवासी व गवळी समाज मोठया प्रमाणात राहतो. या गावातील लोकांचे उदरनिर्वाहचे साधन म्हणजे शेती होय. शेतीला जोड धंदा म्हणून दुग्ध व्यवसाय या गावात मोठया प्रमाणात आहे. गाव घनदाट जंगलत असल्यामुळे या गावात अस्वल व वाघ या हिंश्र प्राण्याचा वावर दिवस रात्र असतो. अशाही परिस्तितीत या गावात लालपरी येत नाही. मागील वर्षी रस्त्याचे काम करण्यात आले. या मार्गांवर एकही लालपरी धावत नसल्याने शालेय मुले व मुली शिक्षण घेण्यासाठी आष्टी या तालुका स्तळी सहा किलोमीटर अंतर पायपीट करून ये जा करतात. बांबर्डा या गावातून पायदळ येऊन चामला या गावात येतात व पुढे पायदळ जाऊन थार गावाच्या प्रवाशी निवार्याजवळ येऊन थांबतात तेव्हा कुठे लालपरी मध्ये बसून आष्टी येथे जाता येते. शाळा सुटल्यावर घरी जाण्यासाठी थार गावापासून पायदळ करीत बाबरडा गावात जातात. जाताना अस्वल व वाघाची भीती मनात ठेऊन घरी जाता येते. गावातील पोलीस पाटील मोहित बगलेकर यांनी ही कॅमेऱ्यात कैद करून डेपो मॅनेजर तळेगाव यांना दाखविली. मात्र निगर गट्टू अधिकारी समस्या ऐकून न घेता अंगावर धावून जातात. महिला अधिकारी डेपो मॅनेजर असल्यामुळे तक्रारी करण्यात कुणीही पुढे येत नाही. दोन वर्षांपूर्वी बोरखेडी येथील कार्यकर्ता व पत्रकार हे दोघेही तळेगाव येथे समस्या मांडण्यासाठी गेले असताना त्यांना समस्या ऐकून न घेता हुसकावून लावण्यात आले होते. लोकप्रतिनिधी यांच्या कडे समस्या मांडण्यासाठी गेल्यावर समस्या मार्गी लागत नाही अशी येथील ग्रामस्याची ओरड आहे. पोलीस पाटील मोहित बगलेकर यांनी शासकीय स्तरावर लालपरी उपलब्ध व्हावी प्रयत्न चालूच ठेवले आहे.