हुडकेश्वर पोलिस स्टेशनच्या पोलिस अधिकार्यांना खरेदी केल्याची भाषा वापरुन जमिन हडप करणारा भु-माफिया सचिन नवघरे विरोधात डी.सी.पी. गजानन राजमाने कारवाई करणार का ?
विशेष प्रतिनिधी / नागपूर :
अजनी चौक को-ऑप. हाऊसिंग सोसायटी मर्या. नागपूर चे अध्यक्ष भारत श्रीराम गाणार रा. अजनी चौक, वर्धा रोड नागपूर यांनी मागील ४० वर्षापुर्वी संस्था रजिस्टर केली. सन १९८६ साली खसरा नं. १३३ अ. मौजा नरसाळा त. जि. नागपूर ग्रामीण येथे संस्थेने ले-आऊट पाडून प्लॉट विकलेले आहे. परंतू सर्वज्ञ को-ऑप. हाऊसिंग सोसायटी यांनी बोगस बनावट कागदपत्रे तयार करुन लोकांची आर्थिक फसवणुक केली आहे. सर्वज्ञ को-ऑप. हाऊसिंग सोसायटीच्या सभासदांनी बोगस व बनावट कागदपत्रे तयार करुन लोकांची आर्थिक फसवणूक केली आहे. अजनी चौक को-ऑप. हाऊसिंग सोसायटी मर्या. नागपूर च्या प्लॉट धारक सभासदांच्या प्लॉट वर जबरीने कब्जा करण्याचे कार्य भुमाफिया सचिन देवराव नवघरे व त्याचा भाऊ केशव नवघरे, अशोक तलमले, रमाकांत अग्नीहोत्री करीत आहे. अनेकदा सदर सोसायटीच्या लोकांनी हुडकेश्वर पोलिस स्टेशन मध्ये तक्रारी दिल्या. परंतू सन २०१३ ते आजपर्यंत या गावगुंडा विरोधात कोणतीच कारवाई न करता उलट ज्यांची जमिन हडप केली असे राकेश घोसेकर विरोधात कोणतीही चौकशी न करता हुडकेश्वर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. अन्यायग्रस्त राकेश घोसेकर यांनी पोलिस आयुक्त ते हुडकेश्वर पोलिस स्टेशनला सन २०१३ ते आजपर्यंत अनेकदा तक्रारी देवून न्याय मागितला. परंतू हुडकेश्वर पोलिसांनी डोळ्यावर गंधारीची पट्टी बांधून या तक्रारीकडे अर्थपुर्ण डोळेझाक केली. यामुळे या गावगुंडाचे प्राबल्य दिवसेंदिवस वाढत आहे. राकेश नारायण घोसेकर यांनी अजनी चौक को-ऑप. हाऊसिंग सोसायटी रजि. न. र्उझ् प्एउ ११९६/८२ यांचेकडून खसरा न. १३३ अ ले-आऊट मधील प्लॉट नं. ११२ क्षेत्रफळ ३००० चौ. फुट सन २०१३ मध्ये विकत घेतला असून त्याचा कायदेशिर मालकी हक्क राकेश घोसेकर यांच्याकडे आहे. मालमत्ता टॅक्स सुद्धा नियमित महानगर पालिकेमध्ये भरला जात आहे. सन २०१३ मध्ये गैरअर्जदार व भुमाफिया सचिन देवराव नवघरे रा. १०३ गणेशधाम हुडकेश्वर रोड नागपूर याने अन्यायग्रस्त राकेश घोसेकर विरोधात हुडकेश्वर पोलिसात खोटी तक्रार दिली. खसरा न. १३३ (अ) च्या बाजुलाच सर्वज्ञ हाऊसिंग सोसायटी असून त्याचा खसरा न. १३३ ब आहे. सर्वज्ञ हाऊसिंग सोसा. चे तत्कालीन अध्यक्ष मृतक युवराज बोबडे यांनी खसरा न. १३३ अ मध्ये अतिक्रमण करुन बेकायदेशिर पणे लोकांना प्लॉटची अवैध्य विक्री करुन दिली. त्यापैकी देवराव नवघरे यांचा समावेश आहे. सर्वज्ञ हाऊसिंग सोसा. यांनी बनावट कागदपत्रे ग्रामपंचायतला हाताशी धरुन खोटे दस्ताऐवज तयार करुन साठगाठ करुन बनविले. त्यामुळे सदर प्लॉट न. ११२ हा अजनी को-ऑप हाऊसिंग सो. मध्ये खरोखरच नोंद आहे का ? याबाबत पैसे भरुन ग्रामीण सिटी सर्व्हे विभागाकडून मोजणी करुन प्रत्यक्ष खात्री करुन घेतली. त्यावरुन १८ हजार चौ. फुट जागेवर सर्वज्ञ हाऊ. सोसा. ने अतिक्रमण केल्याचे सिद्ध झाले आहे. तसेच अजनी सोसा. ची ‘क’ प्रत घोसेकर यांचे कडे उपलब्ध आहे. खसरा न. १३३ अ मधील प्लॉट न. १२२ हा प्लॉट राकेश घोसेकर यांच्या मालकीचा असल्याचे कागदपत्रांवरुन स्पष्ट दिसून आले. यामुळे चिडून जावून वारंवार पोलिस स्टेशन हुडकेश्वर व वरिष्ठ पोलिस अधिकार्यांकडे नेहमी तक्रारी करीत राहतो. परंतू भुखंड माफिया सचिन देवराव नवघरे विरोधात कोणतीच कारवाई न करता पोलिस सत्याची बाजू घेवून चालणार्या राकेश घोसेकर विरोधात पोलिस तक्रारी दाखल करतात. भुमाफिया सचिन नवघरे चे नागपूरातील नामांकित गुंडांशी संबंध ठेवून वारंवार जिवानिशी ठार करण्याची धमकी राकेश घोसेकर यांना देता तेव्हा डी.सी.पी. गजानन राजमाने यांनी त्वरीत सत्यता तपासून गावगुंडाचा बंदोबस्त करावा, अशी मागणी अन्यायग्रस्त घोसेकर यांनी केली आहे.
(क्रमश:)