वर्धा ते पिंपळगांव बस फेरी बंद केल्याने विद्यार्थी ञस्त, दैनंदिन अभ्यासावर परिणाम, एस,टी.महामंडळाने लक्ष द्यावे…

0

🔥वर्धा ते पिंपळगांव बस फेरी बंद केल्याने विद्यार्थी ञस्त,दैनंदिन अभ्यासावर परिणाम,
एस,टी.महामंडळाने लक्ष द्यावे.

🔥हाच तो बसफेरी बंद करणारा वाहतूक निरिक्षक शिवा गावंडे.

वर्धा -/ सेवाग्राम पिंपळगांव बस फेरी 10.30 व 2.00 बस फेरी अचानक बंद केल्या ने प्रवासी व विद्यार्थ्यांना कमालीचा ञास सहन करावा लागत असून ञस्त आहे.याचा थेट परिणाम अभ्यासावर होत असून मानसिक ञास सहन करावा लागतो आहे.उपरोक्त विषय तातडीने मार्गी लागावा. जन प्रतिनिधींनी लक्ष द्यावे. महामंडळ वर्धा येथील वाहतूक निरिक्षक शिवा गावंडे पिंपळगाव येथे वरील बस फेरी नियमित सुरू असताना अचानक गेल्या आठ दिवसापासून वरील बस फेरी कुठलेही कारण नसताना बसस्थानक प्रमुख मसराम व वाहतूक निरिक्षक गावंडे यांनी अचानक बस फेरी बंद केल्या ने सेवाग्राम हमदापूर मार्गावरील प्रवाशांना खिळ बसली असून कामकाज वेळेवर होत नाही.आणि विद्यार्थी जेष्ठ नागरिक यांना भर उन्हात कोपरा वरुन ५ समोर किमी प्रवास करावा लागतो. या बसवर पिंपळगाव कोपरा चानकी वघाळा , टाकळी किटे. ख रांगणा (गोडे )येथील विद्यार्थी व शेतकरी प्रवासी रोजनिशी प्रवास करतात परंतु एस टी. महामंडळाचे सबंधित वरील अधिकारी बस ची चौकशी करून विचारणा केली असता विद्यार्थी व प्रवासी. नागरीकांना उद्धटपणे वागणूक देतात व “*कुणाकडे ही तक्रार करा आमचे काही बिघडत नाही “अशाप्रकारे भाषा वापरतात वरील वाहतूक निरिक्षक गावंडे.(क्रमशः)

       ब्युरो रिपोर्ट साहसिक               News-/24 वर्धा 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!