🔥घर चोरी प्रकरणातील आरोपीस अटक,देवळी पोलिसांची कामगिरी अवघ्या काही दिवसांमध्येच मुद्देमालसाह आरोपीस अटक..
देवळी -/ सदर प्रकरण असे की देवळी येथून जवळच असलेल्या कोळोना चोरे येथील महिला अर्चना प्रभाकर यादव (वय :50) हिने देवळी पोलीस स्टेशनला चोरीची तक्रार दिली. ही महिला देवळी येथे काही कारणास्तव आली होती. मात्र काही वेळाने घरी परताच तिच्या निदर्शनास आले की घरातील लोखंडी कपाट उघडे असून त्यात असलेले 24ग्रॅम वजनाचे मंगळसूत्र व रोख रक्कम 35000 रुपये चोरीस गेलेले आढळले. तिने त्वरित देवळी पोलीस स्टेशन गाठले. व तोंडी रिपोर्ट केला.
यातील अज्ञात चोरट्याचा शोध घेण्यासाठी तपास चक्रे फिरविण्यात आली. तपासदरम्यान आढळून आले की तक्रारदाता यांच्या घरचे बांधकाम सुरु असल्याचे कळले.सदर इसम हरिभाऊ शंकरराव गायकवाड. (वय :47) रा. वैद्यपुरा, देवळी याला पो. स्टे. आणून विचारपूस केली असता त्याने चोरीची कबुली दिली. यावरून त्याला अटक करण्यात आली.
सदर कार्यवाही.सौरभ अग्रवाल पोलीस अधीक्षक वर्धा,सदाशिव वाघमारे अप्पर पोलीस अधीक्षक वर्धा, वंदना कारखेले मॅडम उपविभागीय अधिकारी पुलगाव यांचे मार्गदर्शनात, अमोल मंडळाकर ठाणेदार पोलीस स्टेशन देवळी,पोलीस हवालदार नितीन तोडासे,पोलीस अंमलदार सागर पवार, श्याम गावनेर यांनी केली आहे.