वर्ध्यात चोरीतील ४७.८२ लाखाचे सोने जप्त
क्राईम प्रतिनिधी / वर्धा :
एका शहरातून दुसऱ्या शहरात ४७.८२ लाखाचे सोने सोने घेवुन वितरण करण्यासाठी निघालेल्या व्यक्तीला वर्धा येथे लुटले. या प्रकरणी शहर पोलिसांनी सुदाम पांडुरंगजी गाठेकर (वय ३२) रा. पोद्दार बगीचा, स्विपर कॉलनी, वर्धा. यास अटक करत त्याच्या ताब्यातून चोरी केलेला ४७ लाख ८२ हजार ३१९ रुपयाच्या सोन्यातमढलेल्या हिऱ्याच्या अंगठ्या व अन्य सोन्याचे साहित्य जप्त करण्यात आले. अशी माहिती पोलिस अधिक्षक प्रशांत होळकर यांनी शहर पोलिस ठाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, पारख डाया ज्वेलर्स, रायपुर येथुन १४ आणि १८ करेटचे सोन्यात डायमंड मढविलेल्या ७१ अंगठया व ८२ टॉप्स (कानातले)
असे ४७,८२,३१९ रुपये किमतीचे सोन्याचे दागिणे बैतुल (म.प्र.) येथे वितरीत करण्याकरीता दुकाणात काम करणाऱ्या पुरूषोत्तम यादव याच्या कडे दिले होते. दागिणे पोहचता करण्यासाठी बुधवारी (ता.९) रायपुर रेल्वे स्थानकावर सोडण्यात आले होते. परंतु नियोजित ठिकाणी न जाता यादव हा वर्धेला पोहोचला. दरम्यान त्याच्या जवळ असलेले सोन्याचे दागिणे चोरण्यात आल्याचे सागताच पारख डाया ज्वेलर्स रायपूर येथील सोने व्यापारी अमित रमेशकुमार पारख, (वय ४२) रा. रायपूर यांनी शनिवारी (ता. १२) शहर पोलिसात सोने चोरी झाल्या प्रकरणी तक्रार दिली. तपास करत अवघ्या २४ तासाच्या आत महेश उर्फ सुदाम पांडुरंग गाठेकर, याला अटक करत त्याच्या ताब्यातून चोरी केलेला मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधिक्षक प्रशात होळकर,अपर पोलिस
अधीक्षक यशवंत सोळंकी, उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप, यांच्या मार्गदर्शनात ठाणेदार सत्यवीर बंडीवार यांचे निर्देशान्वये पोलिस उपनिरीक्षक गणेश बैरागी, प्रवीण पाटील, सचिन इंगोले, संजय पंचभाई, सुभाष घावड, अनुप राऊत, किशोर साठोणे, दिपक जंगले, सुनिल मेंढे, राजेश ढगे, शाम सलामे, आकाश बांगडे, पवन निलेकर, राहुल भोयर आदींनी केली.
= अशी झाली चोरी
दागिने पोहोचता करण्यासाठी निघालेले पुरुषोत्तम यादव हे मद्यधुंद अवस्थेत वर्धा रेल्वे स्थानकावर आले. दरम्यान चोरट्याची त्याच्याकडे असलेल्या बॅगकडे नजर गेली. त्याच्या जवळील बॅग हिसकावून चोरट्याने मुद्देमाल लांबवला.