संत्रा मोसंबी च्या बागा घेत आहे अखेरचा श्वास जास्त तापमानाचा परिणाम 

0

🔥संत्रा मोसंबी च्या बागा घेत आहे अखेरचा श्वास जास्त तापमानाचा परिणाम.

आष्टी,साहुर प्रतिनिधी शरद वरकड 

 वर्धा -/ जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात मोठ्या प्रमाणात संत्रा मोसंबी उत्पादक शेतकरी असून या भागात संत्रा व मोसंबीचे चांगल्या प्रकारे पिके घेतली जातात यामध्ये शेतकऱ्यांना चांगला फायदा सुद्धा होतो परंतु यावर्षी जास्त तापमानाचा परिणाम थेट संत्रा मोसंबी च्या बागावर होत असून संत्रा मोसंबीच्या बागा पाण्याअभावी व जास्त तापमानामुळे अखेरचा श्वास घेत असल्याचे विदारक चित्र शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर दिसत आहे जानेवारीच्या पहिल्या आठवड्यापासूनच उन्हाचा पारा जास्त असल्याने सुरुवातीला ज्या प्रमाणात फळधारणा व्हायला पाहिजे होती ती मात्र झालीच नाही त्यानंतर अवकाळी पावसाचे संकट उठल्याने साहूर परिसरात मोठ्या प्रमाणात गारपीट झाली असून यामध्ये मोठ्या प्रमाणात फळगड सुद्धा झाली त्यामुळे प्रशासनाच्या वतीने नुकसान भरपाई साठी पंचनामे सुद्धा करण्यात आलेले होते परंतु आजपर्यंत ही मात्र कुठल्याही प्रकारची हालचाल दिसत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहेत आता मात्र झाडावर फळे नसून आपल्या बागा कशाप्रकारे जिवंत राहतील याबाबत शेतकरी विचार करीत असल्याचे दिसून येत आहेत वर्धा जिल्ह्याचे तापमान 47°c च्या वर गेले असून उभ्या संत्रा मोसंबीच्या बागा आता अखेरचा श्वास घेत असल्याचे दिसून येत आहेत त्यामुळे शासनाच्या वतीने संत्रा मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा हात देण्याची मागणी शेतकरी करीत आहेत हे विशेष

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!