​यवतमाळ अर्बन बँकेची कर्जवसुली की ‘सुपारी’?वसुली अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या; 

0

🔥​यवतमाळ अर्बन बँकेची कर्जवसुली की ‘सुपारी’?वसुली अधिकाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या;🔥दि यवतमाळ अर्बन बॅक चे यवतमाळचे अध्यक्ष नितीन खर्चे

🔥पोलिसांची टाळाटाळ उघडी, अखेर न्यायालयाच्या चाबकामुळे कर्मचाऱ्यांवर गुन्हा!

🔥​कर्जदारांचा बळी घेणारा यवतमाळ अर्बन बँकेचा ‘फतवा’ कोणाचा?

🔥भ्रष्टाचारावर पांघरूण घालण्यासाठी मानसिक छळ करून आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा पीडित कुटुंबाचा खळबळजनक आरोप!

 यवतमाळ -/ यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेच्या बेकायदेशीर व अरेरावी कर्जवसुलीच्या धोरणाने एका निष्पाप व्यावसायिकाचा बळी घेतला आहे. वसुलीच्या नावाखाली गुंडगिरी करत मानसिक छळ, सार्वजनिक अपमान व धमक्या देऊन व्यावसायिक शालीक विरुळकर यांना आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या यवतमाळ अर्बन बँकेच्या दोन कर्मचाऱ्यांवर अखेर न्यायालयाच्या कडक ताशेऱ्यांनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

​स्थानिक कळंब पोलीस ठाण्याचे ठाणेदार धनराज निळे यांच्याकडे पीडित कुटुंबाने वारंवार तक्रारी करूनही गुन्हा दाखल न करता प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, न्यायदंडाधिकारी हर्षल नानासाहेब पोले यांच्या न्यायालयाने पोलिसांना चांगलाच दणका देत यवतमाळ अर्बन बँकेचे वसुली अधिकारी शाम भुसेवार आणि कर्मचारी महेश धनरे यांच्याविरुद्ध गंभीर कलमांन्वये गुन्हा नोंदवून सखोल तपासाचे थेट आदेश दिले आहेत.

 कळंब येथील व्यावसायिक शालीक विरुळकर यांनी यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेकडून कर्ज घेतले होते. काही आर्थिक अडचणींमुळे कर्जाचे हप्ते थकल्याने बँकेचे वसुली अधिकारी शाम भुसेवार व महेश धनरे यांनी त्यांच्यावर मानसिक दबाव आणण्यास सुरुवात केली. वारंवार फोनवरून शिवीगाळ करणे, धमकावणे आणि घर व दुकान जप्त करण्याची धमकी देणे असे प्रकार सतत सुरू होते. ​यातच २८ डिसेंबर २०२४ रोजी या दोन्ही कर्मचाऱ्यांनी सर्व मर्यादा ओलांडल्या. शालीक विरुळकर यांच्या उपहारगृहात (हॉटेल) जाऊन, उपस्थित ग्राहकांसमोर त्यांना अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ करण्यात आली. एवढेच नव्हे तर त्यांच्या अंगावर धावून जात सार्वजनिक ठिकाणी धक्काबुक्की करण्यात आली आणि उपहारगृहाचा ताबा घेण्याची थेट धमकी देण्यात आली.

​या भयानक सार्वजनिक अपमानामुळे शालीक विरुळकर कमालीचे मानसिक तणावात गेले. बँकेच्या कर्मचाऱ्यांच्या गुंडगिरीने खचलेल्या शालीक यांनी अखेर ३० डिसेंबर रोजी विषारी औषध प्राशन करून आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येपूर्वी त्यांनी आपली पत्नी उमाबाई विरुळकर यांना “बँकेच्या या दोघांच्या अपमान आणि धमक्यांमुळेच मी हे टोकाचे पाऊल उचलत आहे” असे अश्रूधार ढाळत सांगितले होते. ​पतीच्या आत्महत्येनंतर शोकाकुल उमाबाई शालीक विरुळकर यांनी न्यायासाठी कळंब पोलीस ठाणेदार धनराज निळे यांच्यासह जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रारी दाखल केल्या. परंतु, बँकेच्या दबावापोटी किंवा प्रशासकीय अनास्थेमुळे पोलिसांनी आरोपींविरुद्ध स्वतंत्र गुन्हा दाखल करण्यास स्पष्ट टाळाटाळ केली आणि केवळ ‘मर्ग’ नोंदवून प्रकरण गुंडाळण्याचा प्रयत्न केला. ​पोलीस प्रशासनाकडून न्याय मिळत नसल्याचे पाहून उमाबाई विरुळकर यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNS) कलम १७५ (३) अंतर्गत न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने जेव्हा पोलिसांकडून अहवाल मागवला, तेव्हा पोलिसांचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला. अर्जदार व साक्षीदारांचे जबाब नोंदवल्याचा दावा पोलिसांनी केला, परंतु त्याचे कसलेही पुरावे किंवा प्रती न्यायालयात सादर करण्यात आल्या नव्हत्या.

​न्यायदंडाधिकारी हर्षल नानासाहेब पोले यांनी उपलब्ध कागदपत्रे, तक्रारी आणि पोलिसांचा थातुरमातूर अहवाल तपासून पोलीस प्रशासनाला चांगलेच फटकारले. न्यायालयाने प्रथमदर्शनी हा दखलपात्र अपराध असल्याचे स्पष्ट करत भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम १०८, २९६, ११५(२), ३५२, ३५१(२) व ३(५) अंतर्गत आरोपी शाम भुसेवार व महेश धनरे यांच्यावर गुन्हा नोंदवून कायद्यानुसार कठोर तपास करण्याचे आदेश कळंब पोलिसांना दिले. ​या धक्कादायक प्रकरणामागे यवतमाळ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेतील कोट्यवधींचा भ्रष्टाचार दडला असल्याचा गंभीर आरोप आत्महत्याग्रस्त विरुळकर कुटुंबाने केला आहे.

‐——————————————————–

 ​”यवतमाळ अर्बन बँकेत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार आणि आर्थिक गैरव्यवहार झाला आहे. हा स्वतःचा भ्रष्टाचार दडवून ठेवण्यासाठी आणि वसुलीचे आकडे फुगवून दाखवण्यासाठी बँकेच्या अध्यक्षांनी एकप्रकारे वसुलीचा अनधिकृत फतवाच काढला आहे. बँकेचे अधिकारी सामान्य कर्जदारांना वेठीस धरून त्यांचा जीव घेत आहेत. ही केवळ आत्महत्या नसून बँकेच्या धोरणांमुळे झालेला ‘खून’ आहे!”

आत्महत्याग्रस्त विरुळकर कुटुंबीय ​​या न्यायालयीन आदेशामुळे यवतमाळ जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात आणि बँक वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, आता कळंब पोलीस याप्रकरणी आरोपींवर काय कारवाई करतात आणि बँकेच्या वरिष्ठ व्यवस्थापनाची चौकशी होते का, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.(क्रमशः)

          ब्युरो रिपोर्ट साहसिक      News-/24 यवतमाळ 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!