🔥देवळीत गांजा विक्रेत्यांचा सुळसुळाट

🔥गांजा सेवन करणाऱ्या मध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात

🔥अंमली पदार्थ बंदी कायदा फक्त कागदावर, अमली पदार्थ तस्करांवर कारवाईच्या पोकळ घोषणा.

देवळी -/ सध्या शासनाकडून अंमली पदार्थ बाळगणाऱ्या विरोधात कठोर कायदे बनविण्यात आले आहे.मात्र हे कायदे नुसतं कागदावरच दिसत आहे,कारण देवळी शहरात अनेक ठिकाणी खुलेआम गांजा विक्री सुरू आहे.या गांजा सेवन करणाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात अल्पवयीन शाळेकरी विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

              देवळी शहरांमध्ये काही ठिकाणी पान टपरी,चाय टपरी वाल्यांनी त्यांच्या व्यवसायिक ठिकाणी पडदे लावून गुप्त अशा बैठकीचे ठिकाण बनविले आहे त्यामध्ये अल्पवयीन मुले व शाळेकरी विद्यार्थी आत मध्ये बसून गांजा,सिगरेट आणि अन्य प्रकारचे अंमली पदार्थ सेवन करताना दिसतात.त्यामुळे देवळी पोलिसांची गुप्त यंत्रणा पूर्णतः कोलमडलेल्या सारखी दिसत आहे. त्यामुळे शहरात सुरू असलेली खुलेआम गांजा तसेच अन्य अंमली पदार्थ विक्रीची माहिती कदाचित देवळी पोलिसांना नसावी त्या कारणांनी शहरांमध्ये अंमली पदार्थ विक्रीचे जाडे(रॅकेट)पसरले आहे.

                देवळी शहरात गांजा तथा अन्य अंमली पदार्थ सेवन करण्यासाठी लागणारे साहित्य खुल्या चाय व पान टपरीवर विक्री केली जात आहे.ते घेणाऱ्यांमध्ये ग्रामीण भागातील शिक्षण घेण्यासाठी आलेले विद्यार्थ्यांचा तथा शहरातील विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. 

         देवळी शहरात दारूचे फार अनेक ठिकाणी मोठे व्यवसाय आहे .पोलीस प्रशासन त्यांच्यावर कारवाई सुद्धा करतात आणि दारू विक्रेत्यांवर कायदेशीर कारवाई सुद्धा करतात काही दारू विक्रेते देवळी पोलीस स्टेशनच्या हद्दीतून तडीपार सुद्धा करण्यात आले होते. परंतु देवळी पोलिसांनी अंमली पदार्थ विकणाऱ्या तस्करांन विरोधात आज पर्यंत कोणतीच मोठी कारवाई केलेली नाही कारण अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या विरोधात शासनाने कठोर कायदे बनविले आहे.त्यामुळे अंमली पदार्थ विकणाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ केली जाते व त्यांच्यावर दारू विक्री अंतर्गत कारवाई करण्यात येते.अशी चर्चा शहराच्या अनेक भागांमध्ये नागरिक करत आहे. 

          देवळी शहरामध्ये यशोदा नदी रोड परिसर,वर्धा रोड परिसर,सोनेगाव , डीगडोह रोड परिसर,पुलगाव रोड परिसर,संध्याकाळच्या वेळेस गांजा पिणाऱ्यांची व गांजा विकणाऱ्यांची मोठमोठे झुंड दिसून येतात याची माहिती पोलिसांच्या गुप्तचर विभागाला नाही का? असा प्रश्न देवळीकर विचारत आहे.

           पोलिसां तर्फे अंमली पदार्था सेवनाने जीवन कसे उध्वस्त होते. याची माहिती देण्या करिता शाळेकरी विद्यार्थ्यां साठी मोठमोठे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. मोठमोठे वक्ते बलवून शाळेकरी तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांन करिता मोठे मोठे कार्यक्रमाचे आयोजन केली जाते. या कार्यक्रमातून अंमली पदार्थाच्या सेवनापासून कसे दूर राहावे , त्याचे दुष्परिणाम काय? हे भाषणातून उपदेश देण्यात येत. परंतु प्रत्यक्षामध्ये अंमली पदार्थ विकणाऱ्या तस्करान विरोधात कारवाई करण्यात दिरंगाई दिसते. तसेच विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ सेवनाकडे वळविणाऱ्या विरोधात कठोर कारवाई का करण्यात येत नाही? असे प्रश्न पालक वर्ग व शहरातील सुज्ञ नागरिक करीत आहे. या अंमली पदार्थ विकणाऱ्या विरुद्ध अंमली पथक विभागाने कठोर कारवाई करून तरुण पिढी ला या व्यसनापासून दूर करावे अशी मागणी शहरातून नागरिक करीत आहे.(क्रमशः)

           सागर झोरे साहसिक       News-/24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!