वर्ध्यात रेव्ह पार्टी’वर धाड; चाळीस हजारांची विदेशी दारू जप्त, दोघांना अटक
क्राईम प्रतिनिधी / वर्धा:
देश कोरोनाच्या विळख्यात असतानाच रेवा पार्ट्या करण्याचे आणि अंमली पदार्थ सेवन धिंगाणा घालण्याचे प्रकार वर्ध्यात उघडकीस आला आहे.अवैध दारूविक्रीने ओळखल्या जाणरे वर्धा आता रेव्हपार्टीच्या दिशने वाटचाल करू लागले आहे. सावंगी पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या पालोती शेतशिवारातील आलिशान फ्रोर क्वाईन या लॉनमध्ये डिजेच्या तालावर मद्याचे घोट घेत सुरू असलेल्या पार्टीवर सावंगी पोलिसांनी छापा टाकून विदेशी दारू, डिजे जप्त केला. यात मालक व आयोजकाला अटक करण्यात आली असून या पार्टीत महिलांसह 32 जणांचा सहभाग असल्याची माहिती सावंगीचे ठाणेदार जळक यांनी दिली. ही कारवाई काल 26 रोजी रात्री करण्यात आली असून आज 27 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. पालोती शिवारात मद्यपार्टी सुरू असल्याची माहिती सावंगी पोलिसांना मिळाली. त्या आधारावर धाड टाकत कारवाई करण्यात आली. या कारवाईत साऊंड सिस्टिमसह 40 हजाराची विदेशी दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी आयोजक सौरभ ठाकूर व फ्रोरक्वाईन लॉनचा मालक उमेश जिंदे या दोघांना अटक करण्यात आली. याप्रकरणी जिंदे व ठाकूर यांना न्यायालयात हजर केले असता सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असल्याची माहिती सावंगीचे ठाणेदार धनाजी जळक यांनी दिली. या कारवाईत मल्हारी तालीकाटे, रुचिरा पात्रे, प्रदीप राऊत, विजय पंचटीके, अमोल भीवापुरे, प्रशांत वंजारी, सुरज जाधव, श्रावण पवार, किशोर साखरे, श्रीकांत चव्हाण, पुमन ठाकरे यांनी केली.