संडे ठरला ऍकसिडन्ट ‘डे’ जिल्ह्यात चार ठिकाणी अपघात, चार जण ठार तर चार जखमी
प्रतिनिधी/ वर्धा:
वर्ध्यासाठी रविवार हा अपघात दिवस ठरला आहे. रविवारी पवनार, दत्तपूर आणि करंजी भोंगे या ठिकाणी अपघाताची मालिकाच समोर आली आहे. करंजी भोंगे येथे पती व पत्नी अशा दोघांचा अपघातात मृत्यू झाला तर पवनार येथे एका महिलेचा मृत्यू झाला आहे, तर दत्तपूर येथे एका इसमाचा मृत्यू झल्याची घटना समोर आली आहे. हा इसम माजी सैनिक दिपक ताकसाडे असून त्याची पत्नी पोलीस विभागात कार्यरत असल्याची माहिती आहे.