सुखकर्ता ग्रामसेवा संघाची वार्षिक सभा संपन्न
प्रतिनिधी/ वर्धा:
महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोती अभियान (उमेद) व्दारा सुखकर्ता ग्रामसेवा संघ पिपरी मेघे अभियाना अंतर्गत घेण्यात आलेल्या वार्षिक सभेमध्ये महिमा स्वयंसहाय्यता समूहाच्या अध्यक्षा वैशाली टिपले व सचिव पल्लवी राऊत यांची सामाजिक समिती मध्ये निवड करण्यात आली होती. २०२१ते २०२२ या कालावधीमध्ये त्यांनी सामाजिक क्षेत्रात यशस्वी पणे कार्य केले, कामकाजा वार्षिक आराखडा सादर केला. उत्कृष्ट कामगिरी केल्यामुळे सुखकर्ता ग्राम सेवा संघा तर्फे त्यांना प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून न्यु इंग्लिश च्या शिक्षिका विद्या राईकवार तसेच केसरीमल कन्या शाळेच्या मुख्याध्यापिका कोडगिरवाल यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. सुखकर्ता ग्राम सेवा संघाच्या अध्यक्ष संगीता कडू , सचिव सुनिता वाघमारे, उपाध्यक्ष सुनंदा उईके , सी आर पी हर्षदा पुंसे, विवो वैशाली गोडे, सीसी अंजली कळमकर , लिना पाटील , संगीता पवार, संगीता कामटकर यांच्या वतीने वैशाली टिपले यांचा उत्कृष्ट सामाजिक कार्यकर्ता म्हणून यावेळी सत्कार घेण्यात आला. तसेच या कार्यक्रमामध्ये विविध क्षेत्रातील महिला,तसेच स्वयंसहाय्यता समूहाच्या महिला उपस्थित होत्या.