वर्ध्यातील इसापूर ग्रामपंचायत शिपायाने कर वसुली केली हडप
प्रतिनिधी/देवळी : सागर झोरे
देवळी तालुक्यातील ईसापुर येथील चक्क ग्रामपंचायतीच्या शिपायाने घर कराची वसुली केलेली रक्कम 30 हजार रुपये खर्च झाल्याचे महप्पत हडप केल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे.त्यामुळे सध्या गावात चांगलीच चर्चा जोर धरत आहे तसेच इसापूर येथे राजू करपते हा शिपाई म्हणून कार्यरत होता.राजू करपतेकडे गावातील नळाला पाणी सोडणे गावांमध्ये घरोघरी जाऊन घर कर गोळा करणे आणि ग्रामसेवकांच्या स्वाधीने करण्याचे काम होते.परंतु राजू करपते हा गावातील साठ हजारांच्या आसपास कर वसूली केली व त्यातील 30 हजार खर्च झाले म्हणून हडप केल्याचे ग्रामपंचायत मधील अधिकाऱ्यांनी सांगितले आहेत.यासंदर्भात राजू करपते ग्रामसेवक पी एस मरापे यांनी दोन वेळा नोटीस पाठवून पैसे भरण्याची ताकीद दिली पण त्याने त्याची दखल न घेता कामावर येणे बंद केले. यावेळी ग्रामसेवक पी एस मरापे यांनी सांगितले की पोलिसात तक्रार नोंदवणार राजू करपते दोन पत्र देऊन पैसे भरणे बाबत सांगण्यात आले तो पत्र देण्यास तयार नाही त्यामुळे गट विकास अधिकारी यांच्या सहमतीने व सरपंच यांच्या सहकार्याने आपण पोलिसात तक्रार नोंदवणार असल्याचे ग्रामसेवक मरापे यांनी सांगितले.तसेच सरपंच प्रणिता आंबटकर यांनी सांगितले की राजू करपते यास पैसे भरण्यास व कामावर येण्यास घरी जाऊन समजावले पण तो दखल घेत नसल्याचे कारवाई करणे आवश्यक आहे.