अमरावतीच्या बंटी -बबलीचे मुंबईत राणातांडव …!
साहसिक न्युज 24 ब्युरो रिपोर्ट :
खासदार संजय राऊत यांनी बंटी बबली म्हणून टीका केलेल्या राणा दाम्पत्याचा चालीसा पठणाचा संकल्प पूर्ण होऊ शकला नाही. आक्षेपार्ह वक्तव्यानंतर अटकेत असलेले रवी राणा आणि नवनीत राणा यांना आज न्यायालयात हजर करण्यात आले होते. आज सुनावणीनंतर राणा दाम्पत्याला 14 दिवसांची न्यायालायीन कोठडी सुनावण्यात आली आहे. राणा दाम्पत्याच्या अडचणीत वाढणार, राणा दाम्पत्याने जामीनासाठी अर्ज केल्याचीही माहिती मिळतेय. परंतू जामिनावर तातडीने सुनावणी करण्यास वांद्रे कोर्टाने नकार दिला आहे. ही सुनावणी 29 एप्रिलला होणार असल्याचे कोर्टाने म्हटलंय. तोपर्यंत राणा दाम्पत्याचा मुक्काम कारगागृहात असणार आहे. त्यामुळे राणा दाम्पत्यांचे हनुमान चालीसा पठण आता कारागृहातच होणार का? असाच प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे.
न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांच्या जामीनावर तातडीने सुनावणी घेण्यास कोर्टाने नकार दिला आहे. त्यामुळे आता त्यांच्या जामीन अर्जावर 29 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. वांद्रे कोर्टात सरकारी वकिलांनी राणा दाम्पत्याच्या 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली. यानंतर राणांविरोधात लावलेल्या कलमांवर राणा दाम्पत्यांचे वकील अॅड रिझवान मर्चंट यांनी आक्षेप घेतला. सरकारी वकिलांनी मागणी केलेल्या राणा दाम्पत्याच्या पोलीस कोठडीला अॅड रिझवान मर्चंट यांनी विरोध केला. ही अटक बेकायदेशीर आहे. दोघेही लोकप्रतिनिधी आहेत. पोलिसांनी कलम 149 नुसार प्रतिबंधात्मक नोटीस बजावली होती त्यानुसार घराबाहेर पडले नाहीत. तेथे शिवसैनिक जमले त्यांनी कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण केला पण त्यांच्यावर गुन्हा दाखल केला नाही. राजकीय हेतूने ही कारवाई करण्यात आलीये असंही अॅड रिझवान मर्चंट यांनी म्हटलं.