वर्धात “कंदील” तर देवळीत भाजपाचे “मेणबत्ती” आंदोलन

0

वर्धात कंदील आंदोलनi :

Sagar zore @ Deol:
वर्धा व देवळी येथे भारतीय जनता पार्टीने कंदील व मेणबत्ती पेटवून महा विकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध करत आंदोलन केले.
देवळी शहरामध्ये आज 24 एप्रिल रोजी सायंकाळी भारतीय जनता पार्टीच्या वतीने कंदील आंदोलन करून महा विकास आघाडी सरकारचा निषेध करण्यात आला आला. शहरातील इंदिरा गांधी चौकात हातात मेनबत्ती तसेच वर्ध्यात कंदील घेऊन भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते दिसून आले
महाराष्ट्रामध्ये कृत्रिम वीज टंचाई असल्याचे यावेळी आंदोलन कर्त्यांचे म्हणणे होते वीज टंचाईच्या समस्येला राज्य सरकार जबाबदार असून राज्यात अघोषित भारनियमन सुरू आहे दीड तासांपासून सहा तासांपर्यंत वीज बंद राहत असल्याने ग्राहक होरपळत असून विज सुरक्षा अनामत रक्कम दुप्पट करून सरकारने ग्राहकांच्या खिशातून केलेली सक्तीची वसुली ताबडतोब थांबवण्याच्या मागणीसाठी आज भाजपाच्या वतीने राज्यव्यापी आंदोलन करण्यात आल्याचे यावेळी आंदोलनकर्त्यांनी सांगितले.
देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली वीजपुरवठा बंद ठेवून हजारो कुटुंबियाच्या उपजीविकेवर गदा आणणार्‍या ठाकरे सरकारच्या निषेधार्थ भाजपाचे हजारो कार्यकर्ते राज्यभर वीज मंडळाच्या कार्यालयावर धडक देतील व देखभाल दुरुस्तीच्या फसव्या कारणासाठी लाभलेले भारनियमन पूर्णपणे मागे घेईपर्यंत आंदोलन सुरू राहील असे यावेळी आंदोलनकर्त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी भाजपचे दिपक फुलकरी , देवळी शहराध्यक्ष दशरथ फुलकरी, देवळी ग्रामीण अध्यक्ष राम खोंड , देवळी ओबीसी सेल अरविंद झाडे , ग्रामीण महामंत्री चंदू पोटे , राजेश इटनकर , प्रवीण लोखंडे , संजय मुजबैले , दिनेश वैद्य , राजू झिलपे , आदी भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!