जिग्गिशा धोटे यांची संभाजी ब्रिगेड हिंगणघाट तालुका विद्यार्थी व युवती आघाडी पदी नियुक्ती
मदनी आमगाव/ गजेंद्र डोंगरे :
संभाजी ब्रिगेड च्या समाजाप्रती असनार्या समता, बंधूता, न्याय या ध्येया मुळे आज समाजातील तरुण तरुणीं चा कल संभाजी ब्रिगेड कल आज मोठ्या प्रमानात वाढत चालला आहे.एकी कडे या देशातील राजकिय पक्ष व संघटना समाजात जाती धर्माचे तेढ निर्माण करुन समाजा च्या अधोगतीचे राजकारण करत आहे. विकासा पासुन ,आपल्या सामजिक प्रश्ना पासुन समाजाला दुर ठेवल्या जात आहे. अश्यातच संभाजी ब्रिगेड आपल्या राजकिय वाटचाली बरोबर आपली सामाजिक वाटचाल सुरु ठेवत महापुरुषां च्या आदर्श विचारधरेला समाजात रुजवत या समाजाला वैचारीक जागृत करुन समाज जागृती व एकीकरना चे कार्य करत आहे. समाजातिल शिक्षण,बेरोजगारी,आरोग्य,शेतकरी कामगार या प्रश्ना ला घेउन लढा देत आहे.त्या मुळेच युवा वर्गाचा कल संभाजी ब्रिगेड च्या प्रवाहात वाढत आहे.
वडिलांच्या वैचारीक विचारांचा वसा अंगिकारून जिग्गिशा धोटे यांनी आज संभाजी ब्रिगेड च्या सामाजिक प्रवाहात प्रवेश घेतला. हिंगणघाट- समुद्रपूर , सिन्दी या भागात विद्यार्थी,युवती यांच्या मधे जिजामाता ,छत्रपती शिवराय,महात्मा ज्योतिबा फुले , सावित्रीबाई फुले , ,ताराराणी साहेब,राजर्षी शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर तसेच संत गाडगेबाबा,तुकडोजी महराज अश्या महापुरुषां चे आदर्श विचार रुजविण्या चे प्रयत्न करणार असे जिग्गीशा यावेळी म्हणाली.
त्यांची संभाजी ब्रिगेड हिंगणघाट तालुका विद्यार्थी व युवती आघाडी अध्यक्ष पदी वर्धा जिल्हा महिला आघाडी अध्यक्ष अनिता येवले यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती करण्यात आली. यावेळी मराठा सेवा संघ प्रवक्ता एंड अरुण येवले, वर्धा जिल्हा अध्यक्ष(पुर्व-दक्षिण), राजेश धोटे, जिल्हा उपाध्यक्ष अशोक वेले, महिला आघाडी कार्याध्यक्षा वर्षा मारबते,वर्धा शहर संघटक प्रतिभा ढोने,विजया धोटे तसेच इतरही सहकारी उपस्थित होते.