एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे
एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण करण्यात यावे
राजसाहेब ठाकरे घेणार दखल – अतुल वांदिले राज्य उपाध्यक्ष मनसे
प्रतिनिधी / हिंगणघाट
आज एस.टी. कर्मचाऱ्यांचा प्रलंबित मागण्या सोडवण्यासाठी व एस.टी. महामंडळाचे राज्य शासनाच्या विलीनीकरण करण्यात यावे यासाठी सर्व कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे.
आज एस.टी. कर्मचाऱ्यांनी मनसे चे राज्य उपाध्यक्ष ‘अतुल वांदिले’ यांच्याकडे धाव घेतली असता त्यांचे निराकरण करण्यासाठी अतुल वांदिले यांनी एस. टी आगारातील संपकरी कर्मचाऱ्यांचा मंडपाला भेट दिली.
यावेळी वांदिले मनोगत व्यक्त करताना एस.टी महामंडळाचे कर्मचारी सतत प्रवाशांना सेवा देत असतात परंतु प्रलंबित मागण्यासाठी न्याय मिळावे यासाठी १०दिवसापासून संपावर आहे या संपामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे त्यातल्या त्यात कर्मचाऱ्याची दिवाळी अंधारात गेली. यात कर्मचाऱ्यांची प्रमुख मागणी अशा प्रकारे एस टी.महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे तसेच वर्ग ३ व ४ मधील कर्मचाऱ्यांना किमान वेतन १८००० रु यानुसार कर्मचाऱ्यांना बेसिक वेतन देण्यात यावे. देशातील काही राज्यात परिवहन महामंडळाच्या ७ वा वेतन आयोगाप्रमाणे तेथील कामगारांना वेतन व किमान वेतन मिळते मग महाराष्ट्रात का नाही?आंध्र प्रदेश परिवहन मंडळ शासनात विलीनीकरण होऊ शकते मग महाराष्ट्रत विलीनीकरण का होऊ शकत नाही?
आधीच कोरोनाने सामान्य लोकांचे जगणे अवघड करून ठेवले आहे त्यात महागाई मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे या महागाईचा काळात संसार चालवणे कठीण होत चालले.
एस टी महामंडळात काम करणाऱ्या कर्मचार्यांना शासकीय कर्मचाऱ्याप्रमाणे वागणूक देऊन त्यांचा मागण्यांकडे लक्ष देऊन कर्मचाऱ्याना न्याय द्यावा.
या संपकरी कर्मचाऱ्यांचा उपोषण मंडपाला भेट दिली त्यावेळी मनसे राज्य उपाध्यक्ष अतुल वांदिले, जिल्हा उपाध्यक्ष अमोल बोरकर, जिल्हा सचिव सुनील भुते, शहर संघटक जावेदभाई, तालुका उपाद्यक्ष किशोर भजभूजे, शिक्षक सेल जिल्हाध्यक्ष जगदीश वांदिले, रुग्ण सेल जिल्हाद्यक्ष उमेश नेवारे उपस्थित होते