राज्याच्या पदाधिकाऱ्यानी घेतली केंद्रीय पंचायत मंत्री कपिल पाटील यांची भेट
जिल्हा प्रतिनिधी / वर्धा –
दिल्लीr येथे जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनचे राज्य पदाधिकारी यांनी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील आणि केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्यासह शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले.
महाराष्ट्रातील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य यांना राज्यांमध्ये काम करत असताना येणाNया तांत्रिक अडचणीस अनेक वेळा तोंड द्यावे लागते आहे. केंद्र सरकारच्यावतीने करण्यात आलेली ७३ आणि ७४ वी घटना दुरुस्ती संपूर्ण राज्यामध्ये लागू करण्यात यावी. जिल्हा परिषद, पंचायत समिती गण व गट यांचे राजकीय आरक्षण दहा वर्षाकरिता कायम करण्यात यावे, आदी मागण्यांचे निवेदन संघटनेच्या वतीने यावेळी देण्यात आले, मंत्री कपील पाटील यांनी यावेळी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन दिले,खासदार विनायक राऊत यांनी संघटनेच्या पदाधिकाN्यांची बैठक मुख्यमंत्री यांचे सोबत घेण्यात येईल असे आश्वासित केले. केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषदेमध्ये वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांची रिक्त पदे भरण्यात येईल असे आश्वासित केले
यावेळी कैलास गोरे-पाटील,संस्थापक अध्यक्ष, उदय बने, प्रदेश कार्याध्यक्ष, सुभाष घरत, प्रदेश सरचिटणीस, जय मंगल, जाधव राज्य उपाध्यक्ष,वर्धा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष तथा जिल्हा परिषद पंचायत समिती सदस्य असोसिएशनच्या विभागीय कार्याध्यक्षा सरिता विजय गाखरे, तसेच सुभाष पवार राज्य उपाध्यक्ष, शरद बुट्टे – पाटील, निवड समिती अध्यक्ष, भारत शिंदे, राज्य उपाध्यक्ष, प्रमोद काकडे, अध्यक्ष प्रतापराव पाटील आदींची उपस्थित होती.
कॅप्शन – केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील आणि केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांना जिल्हा परीषद संघटनेचे निवेदन देताना कैलास गोरे (पाटील ) भारत शिंदे, उदय बने, जिल्हा परीषद अध्यक्षा सरीता गाखरे व इतर