पोहणा येथील श्रीराममंदिर पुनर्निर्माण कामाचे आमदार कुणावार यांनी केले भूमिपूजन
प्रतिनिधी / हिंगणघाट :
पोहणा येथे प्राचीन राममंदिर आहे,पुरातन मंदिराची पड़झड झाली असून मंदिर समिति तसेच गावकऱ्यांतर्फे या प्राचीन राममंदिराचा जीर्णोद्धार करण्याचे ठरविल्यानंतर आमदार समिर कुणावार यांचे शुभहस्ते या जीर्णोद्धार बांधकामाचे भूमिपूजन करण्यात आले.
याप्रसंगी जिल्हा परिषदेचे सभापती माधव चंदनखेडे , हिंगणघाट पंचायत समितीच्या सभापती शारदा आंबटकर, माजी सभापती गंगाधर कोल्हे, रामचंद्र पवार, दौलत जीवतोडे, ह.भ.प.मयुर महाराज, भाजपचे समुद्रपूर तालुकाध्यक्ष संजय डेहणे,भाग्येश देशमुख, सुरेखा शिंदे, कविता कुमरे, पंजाब पानवटकर , त्रिलोक नाहर, सुधाकर कोंबे , प्रकाश देशमुख, विशाल देशमुख , अमोल पवार, गजानन बारापात्रे, विनायक कोंबे , अमोल सोनटक्के, विजय टिकले, विलास दाते, गजानन चरडे, महादेव बारापात्रे यासह
इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
भूमिपूजन कार्यक्रमप्रसंगी आमदार समिर कुणावार यांनी गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन जीर्णावस्थेतील श्रीराम मंदिराच्या पुनर्निर्माण कार्याचे कौतुक करीत स्वतःच्यावतीने मंदिर पुनर्निर्माण कार्यासाठी सुमारे १ लक्ष रुपये देण्याची घोषणा केली.