साहसीक जनशक्ती संघटना सेलू नगर पंचायत, वर्धा नगर परिषद, सिन्दी व कुषी उत्पन बाजार समिती, पंचायत समिती तसेच जिल्हा परिषदेच्या निवडणूका स्वबळावर लढणार

0

प्रतिनिधी / वर्धा :

सेलू येथे जनशक्ती संघटनेची सभा संस्थापक अध्यक्ष रवींद्र कोंटबकार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यामध्ये सेलू नगरपंचायत ते प्रभाग निहाय १७ हि उमेदवाराची अंतिम यादी तयार करण्यात आली असून, वर्धा नगर परिषद निवडणूक, सिंदी व वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीबाबत चर्चा करण्यात आली. त्यावर साहसिक जनशक्ती संघटना सेलू व वर्धा या दोन्ही बाजार समितीच्या ग्रामपंचायत गट, सोसायटी गट, हमाल मापारी गट, अडते व्यापारी गटाच्या सर्व जागा लढविणार असे सर्वानुमते ठरले . तसेच वर्धा नगर परिषदेच्या ३९ जागा लढविणार व त्यासाठी उमेदवार सुद्धा प्रत्येक प्रभागात आरक्षणानुसार निश्चित केले जाईल, तसचे वर्धा जिल्हा परिषद सोबतच सेलू व वर्धा पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा संघटना लढविणार असल्याने व काही उमेदवार जवळजवळ निश्चित असल्याने त्यांनी कामाला लागावे असे मार्गदर्शन करण्यात आले. सेलू बाजार समितीची निवडणूक व सेलू तालुक्यातील पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणूक लढवू इच्छुक उमेदवारांनी साहसीक जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष रवीद्र कोंटबकार व संपर्क प्रमुख गणेश खोपडे , तालुका युवा अध्यक्ष सागर राऊत, अन्सार शेख , राजू झाडे, श्याम सुंदर बोबडे, बालू डेकाटे, पांडे महाराज यांच्याशी संपर्क साधावा तसेच वर्धा तालुक्यातील जिल्हा परिषद, पंचायत समिती , वर्धा नगर परिषद व वर्धा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक लढविण्यास इच्छुकांनी साहसीक कार्यालय वर्धा,तसेच मकरन पाठक , महेश ठाकूर, अनुप जयस्वाल , बाजीराव हिवरे, पवन कुक्रेजा , शक्तीं नाडे, रमेश मोगरे, इम्रान राई , निरज त्रिपाठी, विल्सन मोखाडे , रसुल भाई यांच्याशी संपर्क साधावा , या सर्व निवडणुका येत्या चार महिन्यात होणार असल्याने संघटनेच्या सर्व संभाव्य उमेदवारांनी कामाला लागावे अशा सूचना यावेळी देण्यात आल्या , यावेळी संघटनेचे ज्येष्ठ महिला , युवा पदाधिकारी संभाव्य नगर पंचायत बाजार समिती , नगर परिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदचे उमेदवार व कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!