शिवसेनेच्या अल्पसंख्याक आघाडी जिल्हाध्यक्ष पदी आसिफ शेख यांची नियुक्ती
- प्रतिनिधी / वर्धा :
शिवसेनेच्या अल्पसंख्याक आघाडीच्या जिल्हा अध्यक्षपदी आसिफ शेख सईद शेख यांची नियुक्ती जिल्हाप्रमुख अनिल देवतारे यांनी जिल्हा कार्यालयात पत्र देऊन जाहीर केली.यावेळेस महिला आघाडी जिल्हा संघटिका वंदना भुते,निवासी उपजिल्हा प्रमुख अभय अमृतकर, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख दिलीप भुजाडे,तालुका प्रमुख गणेश इखार,शहर प्रमुख अँड उज्ज्वल काशीकर,मागासवर्गीय सेनेचे उपजिल्हा प्रमुख मनोहर नाईक,उपतालुका प्रमुख प्रदीप मस्के,उपशहर प्रमुख किशोर लाखे,वासुदेव बोन्द्रे, रमेश सावरकर, राजू जोशी,यांची उपस्थिती होती.
दि.२४ नोव्हेंबर रोजी जिल्हाप्रमुख अनिल देवतारे यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा कार्यालयात शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली या बैठकीत आसिफ शेख सईद शेख यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.यावेळेस जिल्हाप्रमुख अनिल देवतारे यांनी भगवा दुपट्टा व पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले.
आसिफ शेख हे सामाजिक कार्यकर्ते असून ते भाजपचे अल्पसंख्याक सेलचे माजी जिल्हाध्यक्ष होते.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी प्रखर हिंदूत्वा सोबत सर्व जातीधर्माचा आदर करण्याची शिकवण दिली तर पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांनी मागील दोन वर्षात महाराष्ट्राला सामाजिक सलोख्याचे राज्य म्हणून ओळख निर्माण केली व यशस्वीपणे आघाडी सरकारचे नेतृत्व करीत असल्याने प्रभावित होऊन शिवसेनेत प्रवेश करीत असल्याच्या प्रतिक्रिया आसिफ शेख यांनी व्यक्त केल्या.
त्यानी आपल्या नियुक्ती बद्दल संपर्क प्रमुख अनंत गुढे, जिल्हाप्रमुख अनिल देवतारे यांचे आभार व्यक्त केले. तर उपस्थितां सहित आसिफ शेख यांचे पत्रकार अण्णा तिवारी,अक्रम शेख,शौकत मामू, हाजी अजिज सिद्दिकी, युनूस खान पठाण, अन्वर शेख, धरम शेंडे, जयपाल खंडारे,गणेश सोनटक्के,वीर राखडे,आकाश खरे, आकाश हातागडे, आसिफ शेख,आदींनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.