महालक्ष्मी कंपनीतील अधिकाऱ्याचे महाराष्ट्रातील महिलांबाबत अश्लील वक्तव्य…

0

हिच ती महालक्ष्मी टी एम टी इस्पात कंपनी (S M W) येथे झाला महिलेचा लैंगिक छळ.

महिलेच्या तक्रारीवरून देवळी पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल.

देवळी / पूर्वीची महालक्ष्मी स्टील कंपनी व आत्ताची SMW इस्पात कंपनी नेहेमीच या ना त्या कारणाने चर्चेत असते. कधी कंपनी द्वारे पसरविल्या जात असलेल्या विषारी प्रदूषणामुळे तर कधी स्थानिकांना डावलून परप्रांतीयांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्यामुळे.आता वेगळ्याच कारणाने ही कंपनी चर्चेत आहे. कंपणीमधीलच एका २९ वर्षीय सिक्युरिटी डिपार्टमेंट मध्ये काम करीत असलेल्या महिला कर्मचाऱ्याने कंपनीतील सिक्युरिटी हेड रवीशंकर प्रसाद यांनी कंपनीच्या गेटवर असलेली ड्युटी बदलवून रिसेप्शनिस्ट च्या जागी ड्युटी लावून देण्याच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी केल्याच्या गंभीर तक्रारिवरून आज पोलिस स्टेशन देवळी येथे भा.द.वि. ३५४ अ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर महिलेने आरोपीच्या मागणीस विरोध केल्यानंतर सिक्युरिटी हेड एवढ्यावरच थांबला नाही तर महाराष्ट्रातील विवाहित महिलांबाबत अत्यंत घाणेरडे अश्लील वक्तव्य केल्याची तक्रारीत नोंद आहे. सदर आरोपी रवी शंकर प्रसाद हा बिहार येथील असून यापूर्वी देखील त्या सिक्युरिटी अधिकाऱ्याचे असेच गंभीर वक्तव्य केल्याचा आरोप अनेकांनी केला आहे. सदर महिलेवर तक्रार न देण्याचा दबाव असल्याने सदर महिलेने देवळीतील एका सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने पोलीस स्टेशन गाठून आरोपी विरुद्ध तक्रार नोंदविण्यात आली. घडलेल्या घटनेची माहिती दूरध्वनी वरून पोलीस अधीक्षक वर्धा यांना देण्यात आली त्यानंतर देवळी पुलगाव चे उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण यांनी देवळी पोलीस स्टेशन गाठले त्यावेळी देवळी पोलीस स्टेशन मध्ये देवळीचे ठाणेदार आणि तक्रारदार महिला सोबत आलेल्या सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये चांगलीच तू तू मैं मैं झाली तुम्ही पोलीस अधीक्षकांकडे का गेले या कारणावरून चांगलाच गोंधळ उडाला पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल चव्हाण यांच्या मध्यस्थिती वातावरण शांत करण्यात आले.या घटनेनंतत सदर महिलेने कामाच्या ठिकाणावर आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याची माहिती महालक्ष्मी कंपनीचे सीईओ प्रतीक बिंदल यांना दिली. परंतु या संबंधित अधिकाऱ्यांने आरोपीची पाठराखण केल्याचा आरोप महिलेने केला. फिर्यादी महिलेने महिला व बालकल्याण कडे तक्रार केल्यानंतर सदर महिलेचे कंपनीने गेट बंद करून कामावरून काढण्याच्या उद्देशाने बदलीचे पत्र दिल्याचा सुद्धा आरोप महिलेने केला आहे.फिर्यादी महिलेला शरीर सुखाची मागणी केल्या प्रकरणी व महाराष्ट्रातील महिलांविषयी संतापजनक वक्तव्य केल्या प्रकरणी सदर आरोपीला कंपनीतून बडतर्फ करून त्याच्या विरुद्ध कठोर कारवाईची मागणी देवळीतील अनेक सामाजिक संघटनांनी केली आहे. आरोपी रवी शंकर प्रसाद याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करून आरोपीस पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.

सागर झोरे साहसिक न्यूज /24 देवळी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!