हिंगणघाट तहसीलदाराणे 22 रेती माफियावर केली कारवाई: 27 लाख 19 हजार 300 रुपयाचा दिला दंड
हिंगणघाट/इकबाल पहेलवान
तालुक्यातील पार्डी व कापसी रेती घाटातून अवैध रित्या गोण खनिजाची तस्करी होत असल्याने हिंगणघाट येथील तहसीलदारा मार्फत गोण खनिज माफिया वरती आळा घाल्यासाठी मोहीम राबविण्यात आली. ही मोहीम 1 ऑक्टोबर ते 25 नोव्हेंबर पर्यंत राबविण्यात आली असून त्यामध्ये 22 गोण खनिज माफियावर कारवाई करून त्यांचे वाहने जप्त करण्यात आले असून त्यांच्यावर एकूण 27 लाख 19 हजार 300 रुपयाचा दंड थोटावण्यात आला आहे. गोण खनिज चोरीला आळा बसविण्यासाठी हिंगणघाट तहसीलदार यांच्या कडून एका स्थायी पाठकाची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच हिंगणघाट तालुक्यामध्ये अवैध गोण खनिज उतखानन व वाहतूक होऊ नये म्हणून एका भरारी पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे यामुळे जिल्ह्यातील गोण खनिज माफियाचे चांगलेच धाबे दानाणले आहे. ही सर्व कारवाई हिंगणघाट येथील तहसीलदार यांच्या मार्गदर्शनात करण्यात आलेली आहे.