कारंजा /तालुक्यातील बोटोणा येथे पिण्याचा पाण्याचा पुरवठा करण्याकरिता तत्कालीन सरपंच विश्वनाथ जी कामडे यांच्या कार्यकाळात जलकुंभ उभारण्यात आला होता.आज या जलकुंभाला
३५ ते ४0 वर्ष झाले असुन कुंभाची
अतिशय वाईट दुरावस्था झाली आहे.
नविन जलकुंभ उभारण्यात आला असुन त्यातुन
गावातील पाणी पुरवठा सुध्दा सुरळीत
चालु आहे.मात्र जुना जलकुंभ जिर्ण
अवस्थेत केव्हा कोसळून पडेल याचा नेम नाही.या जिर्ण जलकुंभामुळे रहदारीस धोका निर्माण झाला आहे.
नागरिकांना जिव मुठीत धरून मार्गक्रमण करावा लागत आहे.
तेव्हा हा जिर्ण जलकुंभ त्वरीत पाडण्यात यावा.निवेदन ग्रामपंचायत व शासन दरबारी देवुन विनंती बोटोणा येथिल महिला मंडळानी व ग्रामस्थांनी केली आहे.