देवळी तालुक्यातील कुख्यात दारू सप्लायर दिपक गावंडे याच्यावर कार्यवाही कधी: दिपक वर पूर्वीपासूनचं गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून काही गुन्हे न्यायप्रवीष्ठ.
तालुका प्रतीनिधी देवळी:
आजतागाळत देवळी तालुक्यात अवैध खुल्याम दारूचे धंदे मोठ्या प्रमाणात सुरू असल्याने दारूची नेवाण-घेवाण जोमात करणारे जुने दिग्गज तस्कर देवळी पोलिस ठाणेदार यांच्या आशीर्वादाने करतो कोट्यावधी रूपयाच्या दारूची उलाढाल. दिपक गावंडे नामक ठोक दारू विक्रेत्याला गावठी दारू सप्लाय करण्याच्या आरोपात अनेकदा देवळी पोलिसांनी पकडून दिपक वर मुंबई दारूबंदी कायद्याचे कलम १७७, ६५ (ई), ७७ (अ) सहकलम १३० नुसार वर्षभर कार्यवाही करण्यात येते पण आजपर्यंत दिपक गावंडे ला दारूच्या गुन्ह्यामध्ये कोणतीच शिक्षा का झाली नाही ? दारूच्या पंचनांम्यामध्ये वापरण्यात येणारे पंच हे पोलिस ठाण्याचेच जावाई असल्याने शिक्षा काशी होणार ? पोलिसांनी जर पंच योग्य घेतले तर दारू वाल्यांना न्यायालय शिक्षा देणारचं कारण ते पंच फितूर होणार नाही.
दारू विक्रेता दिपक गावंडे याच्यावर पोलिसांनी केलेल्या प्रत्येक दारूच्या कार्यवाहीत पोलिस ठाण्याचे जावाई समजले जाणारे देवराव इंगोळे हेच पंच का म्हणून असतात देवराव इंगोले हेच पंच देवळी पोलिस ठाणे तसेच वर्धा पोलिस ठाणे इथेसुद्धा कार्यवाहयांमध्ये जावाई म्हणून देवराव इंगोलेच दिसतात. मग अश्या कुख्यात दारू विक्रेत्यांना शिक्षा काशी होणार ?
या दारूच्या अवैध विक्रीपायी दिपक भाऊची पोलिसांवर कसून पकड बनली आहे अश्या हप्तेबांध नियोजनामुळे दिपक वर देवळी पोलिस ठाण्यातचं कित्तेक वर्षापासून वेगवेगळे गुन्हे दाखल असून त्यापैकि २०१६ वर्षात अपराध क्रमांक ५०४/२०१६ मध्ये भादवी. चे कलम १४३, १४७, १४८, १४९, ४५२, २३२, ३५४, ५०४ व ५०६ नुसार सुद्धा गुन्ह्याची नोंद असल्याचे दिसून येते.
अश्या बहाद्दर दारू विक्रेत्यांना पोलिसांचाच आशीर्वाद असल्यामुळे स्थानिक परिसरातील गुंडागर्दी जोमात असल्याचे सर्वत्र दिसून येते. अवैध दारू विक्री बाबतचे स्थानिक जनतेचे प्रश्न अधिक कठीण झाले असून या कुख्यात दारू विक्रेत्यांना आळा घालण्यासाठी स्थानिक जनतेची वर्धा पोलिस अधिक्षक साहेबांना विनंती. पोलिस अधीक्षक साहेब देवळी तालुक्याला दारुमुक्त करा अशी विनवणी संसार उध्वस्त झालेल्या पीडित महिलांची आपणास विनंती आहे तसेच भविष्यातील देवळी पोलिस स्टेशनच्या तपासात सरकारी साक्षीदार म्हणून कृपा करून देवराव इंगोले यांना घेवुंच नका अशी विनंती पीडितांकडून करण्यात येत आहे.
क्रमश: