वर्धा -भिडी / नांदेड रेल्वे मार्ग सूरू झाला पन अधूराच झाल्याने रेल्वे स्टेशनवर मात्र सूविधाचा अभाव असून स्टेशनवर पिण्याचेच पाणी मिळत नाही स्टेशनवरील शौच्छालये कोरडेच पडले आहे.भिडी हे वर्धा -नांदेड मार्गावरील वर्धेवरून तिन नंबर वरचे रेल्वेस्टेशन आहे या मार्गाचे काम अधूरेच झाल्याने वर्धा- नांदेड रेल हि फक्त कळंब पर्यंतच सूरू करण्यात आली असल्याने सध्या या रेल्वेस्टेशन वर प्रवाशांची वर्दळ कमी प्रमाणात आहे पूढे हि रेल्वे सेवा नांदेड पर्यंत सूरळित झाल्यास भिडी रेल्वे स्टेशन ला २५ ते ३० खेडे गावांचा परीसर लाभला आहे पूढे या रेल्वे स्टेशन वर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सूरू राहणार आहे
सध्या या रेल्वेस्टेशन वर पाण्याची समस्या गंभिर असून ती त्वरीत सोडवावी व रेल्वे स्टेशन चे बांधकाम करतांना कंत्राटदारांनी येथे पाण्याच्या सूविधासाठी बोर का ?केले नाही असाही प्रश्न येथे उपस्थीत होते आहे तसेच रेल्वे स्टेशन वर जाण्याकरीता भिडी बसस्थानक पासून राष्ठीय महामार्गाच्या भूयारी मार्गा पासून एक शिवपाधन थेट रेल्वे स्टेशनवर गेली आहे याचे अंतर ५००मिटरच आहे व हे रेल्वे स्टेशन व बसस्थानक हाकेच्या अंतरावरील होत आहे पन रेल्वेच्या अधिका-यानी मात्र राष्ट्रीय महामार्ग पासून बाभूळगाव (खोसे)या गावाकडे जाना-या मार्गावरून दिल्याने यांचे अंतर दिड ते दोन किलोमिटर येत असल्याने हा मार्ग शालेय विद्यार्थी, विद्यार्थीनी,व महिलान करीता घातक ठरणार आहे करिता बसस्थानक परिसरातून बाभूळगाव (खोसे)शिवपाधन मोकळी करून खडीकरण करण्यात यावे व या शिवपाधनिवर संध्या गर्भश्रीमंताचे अतिक्रमण वाढले आहे याचं गर्भश्रीमंतानी रेल्वे कडे जाण्याचा मार्ग रेल्वे अधिका-यांना दर्शविला असल्याची गावक-यात चर्चा आहे.