सेलू / येथील वडगाव रोड वरील कापसे क्लिनिकच्या बाजूला पाण्याच्या टाकीजवळ मंदिराच्या प्रांगणात असलेल्या वडाच्या झाडाला चायनीज मांजाला कोकिळा पक्षी अडकल्याचे सौ.सुनिता सुनील लोखंडे दोन मजली घरातील खिडकी मधून बघितले असता तिला सदर पक्षी हा वारंवार त्याच ठिकाणी उडण्याचा प्रयत्न करतांना दिसत होता व झटके मारताना दिसत असल्याने त्यांच्या लक्षात आले की हा पक्षी त्या ठिकाणी अडकलेला आहे.सदर महिलेस काय करावे ते कळत नसल्याने व तसेच सदर महिला त्या ठिकाणी किरायाने राहततात.नवीनच असल्याने त्यांनी गुगल वरती पक्षी मित्र म्हणून नंबर सर्च केला असता कलेक्टर ऑफिसचा नंबर त्यांना मिळाला.मिळालेला नंबर वर त्यांनी कॉल केले असता कलेक्टर ऑफिस मधून दिनेश उईके,क्षेत्र सहाय्यक यांना संपर्क करण्यात आला व त्यांनी बोर फाउंडेशनचे अध्यक्ष रितेश कोल्हे यांना फोन करून सांगितले की वडगाव रोडवर असलेल्या पाण्याच्या टाकीजवळ एक पक्षी वडाच्या झाडाला अडकलेला आहे तर त्या ठिकाणी तुम्ही तात्काळ या आपण दोघे तिघे मिळून त्या पक्षांची सुटका करू बोर फाउंडेशनचे अध्यक्ष रितेश कोल्हे व वन विभागाचे कर्मचारी दिनेश क्षेत्र सहाय्यक सेलू व बाळू आडे वनरक्षक यांनी ४०-५० फुट उंचीवरून कोकिळा पक्षाला सुखरूप काढून कोकिळा पक्षाचे प्राण वाचले.