तहसिलदाराकडुन लोकशाही दिन साजरा न करणे म्हणजे लोकशाहीची थट्टाच लोकशाही दिन नावापुरताच !…..
औरंगाबाद,पैठण -/ लोकशाही दिन साजरा न करणाऱे पैठण चे तत्कालीन तहसीलदार तथा अंबड तहसीलदार चंद्रकांत प्रकाश शेळके यांच्या वर महाराष्ट्र नागरी सेवा शिस्त व अपिल नुसार कारवाई करण्यात यावी, अशी मागणी अनिता वानखडे यांनी मधुकर राजे आर्दड विभागीय आयुक्त यांच्याकडे केली असुन तक्रारी असे म्हटले आहे की सर्वसामान्य जनतेच्या तक्रारी/ अडचणींना तत्परतेने न्याय मिळण्याची शासकीय यंत्रणा म्हणजे ‘लोकशाही दिन’ होय.’ कार्यपद्धती सुलभ व्हावी यासाठी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी तालुकास्तरावर लोकशाही दिन सुरू करण्यात आला या लोकशाही दिनाची माहिती नागरिकांना उपलब्ध करुन देणे, प्राप्त निवेदनावरील कार्यवाहीचे विविध स्तरावरील संनियत्रण या करिता शासनस्तरावर एक आज्ञावली विकसित करण्यात आली. त्याअनुषंगाने आवश्यक सूचना स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात तहसिलदार यांनी लोकशाही दिनाकरिताचे सोबत जोडलेल्या विहित नमुन्यातील अर्जाना प्रसिध्दी द्यावी. त्यामध्ये या नमुन्यातील अर्जच स्विकारण्यात येईल असेही घोषित करावे. तत्संबंधीचा • फलक त्यांच्या कार्यालयाबाहेर लावावा. पैठण चे तत्कालीन तहसीलदार तथा अंबड तहसीलदार चंद्रकांत प्रकाश शेळके यांनी लोकशाही दिन साजरा केला नाही हे माहीती अधिकारात मागितलेल्या माहिती मध्ये समोर आले आहे.तसेच या नमुन्याच्या प्रती नागरिकांना विनासायास विनामुल्य उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था करावी असे शासनाचे निर्देश असुन पैठण चे तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत प्रकाश शेळके यांनी सर्व नियम धाब्यावर बसवून मनमानी कारभार करीत होते,एवढेच नव्हे तर सध्या कार्यरत असलेल्या ठिकाणी देखील अंबड तहसीलदार चंद्रकांत प्रकाश शेळके यांना लोकशाही दिनाची माहिती मागितली तरी अद्याप ही माहिती दिली नसल्याने त्या ठिकाणी देखील जनतेला लोकशाही दिनाच्या माध्यमातून न्याय मिळण्यासाठी वंचित राहावे लागत असेल याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून अशा मुजोर अधिकारी यांना जनतेचे प्रश्न सोडविण्यापेक्षा स्वतः हा चे काम करण्यात रस आहे हे निदर्शनास येते ,तरी शासनाने अशा तत्कालीन तहसीलदार चंद्रकांत प्रकाश शेळके यांना सक्तीची सेवा निवृत्ती देण्यासाठी चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्यात यावा.अशी मागणी अनिताताई वानखडे यांनी मधुकर राजे आर्दड विभागीय आयुक्त यांच्याकडे केली असुन मधुकर राजे आर्दड विभागीय आयुक्त कारवाही करतील का ? यांचे उत्तर येणारा काळच देईल ऐवढे माञ खरे.
अरक्षद शेख साहसिक न्यूज -/24 औरंगाबाद पैठण