देवळी दहेगाव रस्त्याची जीर्ण अवस्था मृत्यूला देतो निमंत्रण..दोन दुचाकी च्या धडकेत मृतक विक्रम पवार वय ४५ वर्ष
देवळी -/शनिवारी रात्री ९ वाजेच्या दरम्यान मुस्लिम कब्रस्तान समोर दोन भरधाव दुचाकी आपसात भिडल्या त्यामध्ये दोनही दुचाकीस्वार गंभीर जखमी झाले दोघांनाही देवळीच्या ग्रामीण रुग्णालय मध्ये नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यांना लवकरात लवकर सेवाग्राम रुग्णालयात नेण्यात सांगितले परंतु नेते असतांना एका दुचाकी चालकाचा मृत्यू झाला.मिळालेल्या माहीतीनुसार विक्रम पवार हा.भुगाव येथे कंपनीमध्ये काम करीत होता.सकाळी८. वाजता कामावर गेला आणि रात्री ९ वाजता तो आपल्या दुचाकी क्रमांक.. MH,29.3818 यांने घरी जात होता.तर तिवारी ले-आऊट मधून पल्सर दुचाकी ने MH..32AA3978 चा.चालक शेख समिर रा.देवळी हा दुसरी कडून येत होता.परंतु दोन्ही मोटरसायकल भरधाव अवस्थेत मुस्लीम कब्रस्थान समोर आपसात भिडल्या.त्यामध्ये विक्रम पवार तिवारी ले-आऊट देवळी यांचा रुग्नालयात नेताना मुत्यू झाला.तर देवळी इंदिरा नगर निवासी शेख समीर गंभीर जखमी झाला असून त्यांच्यावर सेवाग्राम रुगालयात उपचार सुरु आहे.मुतक विक्रम पवार यांची पत्नी संतोषी विक्रम पवार यांच्या तोडी रिपोर्ट वरून अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे. पूढील तपास देवळी पोलिस चे ठाणेदार सार्थक नेहते यांच्या मार्गदर्शना खाली सुरु आहे.देवळी दहेगाव हा मार्गाची अत्यंत जिर्ण अवस्था झाली आहे मोठ मोठे खड्डे पडले आहे.त्यामुळे या मार्गावर अनेक अपघात होवून अनेकाना आपला जिव गमवावा लागला आहे. हां मार्ग दुरुस्त करण्यासाठी अनेक सामाजिक व राजाकिय पक्ष यांनी हा मार्ग बनविण्यासाठी अनेक आंदोलन केलें तसेच अनेक निवेदन देवून मार्ग बनविण्याची मागणी केली. १० वर्षामध्ये अनेक पक्षाचे राज्य आले आणि गेले परंतु या मार्गाच काम अजुन पर्यन्त झाले नाही.अजुन किती लोकांना आपला जीव गमवावा लागेल असे नागरीक चर्चा करू लागले आहे.