वर्धा -/ वर्ध्यातील ज्येष्ठ पत्रकार व आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता प्रदीप भगत (वय ६४)वर्ष यांचे गुरुवारी दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी व दोन मुल असा परिवार आहे.प्रदीप भगत यांनी दैनिक महासागर पासून पत्रकारितेला सुरुवात केली असून “दैनिक महासागर‘’मध्ये अनेक वर्षे काम केले.त्यानंतर त्यांनी दैनिक सम्राट,दैनिक युवाराष्ट्र दर्शन मध्ये सुद्धा उपसंपादक म्हणून काम केले.तसेच त्यांचा आंबेडकर चळवळीमध्ये सुद्धा मोलाची योगदान त्यांचे राहीले… काही वर्षांपासून ‘भगत’ यांना किरकोळ आजारांनी ग्रासले होते… १५ दिवसापासून त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने सावंगी येथील रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.अखेर गुरुवारी ३० मे रोजी दुपारी त्यांची प्राणज्योत मावळली.आज शुक्रवार रोजी ११ वाजता त्यांच्यावर वर्धा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.