कंत्राटदाराच्या भ्रष्ट कारभारामुळे बैलांसह बैलबंडी फसली शिखलात….

0

🔥पळसगाव (बाई) येथील घटना.🔥गावातील युवकांच्या तत्परतेने वाचले बैलाचे प्राण.                   

🔥कंत्राटदार, अभियंता व ग्रामसेवकावर कारवाई करण्याची मागणी.

सिंदी (रेल्वे) -/ नजीकच्या पळसगाव (बाई) येथे कंत्राटदाराच्या भ्रष्ट कारभारामुळे शेतकऱ्याची बैलबंडी चिखलात फसली.परिणामी,गावातील युवकांच्या तत्परतेने त्या बैलाचे प्राण वाचले.त्यामुळे या भ्रष्ट कंत्राटदारावर कठोर कारवाई करावी,अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
प्राप्त माहितीनुसार पळसगाव (बाई) येथे महात्मा गांधी रोजगार हमी योजना पंचायत समिती सेलू अंतर्गत मागील चार महिन्यापासून गावातील नागमंदिर जवळ पांदण रस्त्यावर नाल्याचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाचे कंत्राट फिरोज शेख यांच्या कंपनीला दिले असून याठिकाणी कंत्राटदाराने जेसीपीच्या साह्याने नाला खोदून केवळ चार ढोले टाकले आहे. दरम्यान, १८ जून रोजी झालेल्या पावसामुळे आलेल्या पुरामुळे या नाल्यावरील माती वाहून गेली. त्यामुळे कंत्राटदाराने या ढोल्याच्या बाजूला मुरूम व गोटा टाकण्याऐवजी तेथे नदीतील गाळ मिश्रित माती आणून टाकली. दिनांक २६ जून रोजी सकाळी १० वाजताच्या सुमारास शेतकरी विठ्ठल बजाईत हे आपल्या शेतात जाण्यासाठी निघाले असता नागमंदिर जवळ त्या नाल्यावर त्यांची बैलबंडी चिखलात जाऊन फसली. यामध्ये त्यांचा एक बैल कसाबसा बाहेर निघाला परंतु, दुसरा बैल मात्र दलदलीत जाऊन फसला. ही माहिती गावातील तरुण युवक रोशन सातपुते, राहुल झाडे, प्रमोद देवतळे, रविंद्र चाफले, तुषार देवतळे, आदेश भोंगरे, मयूर पंडित, प्रफुल देवतळे, शुभम देवतळे, कृणाल नांदे, वैभव वावरे, भूषण पंडित यांना मिळताच घटनास्थळी धाव घेतली. एक तासाच्या अथक परिश्रमानंतर शिखलातून बाहेर काढून बैलाचे प्राण वाचविले.
सदर नाल्यावरील बांधकाम मागील चार महिन्यापासून सुरू असून या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. पंचायत समिती सेलूचे अभियंता धीरज सरदार व ग्रामपंचायत पळसगाव (बाई) येथील ग्रामसेवक धीरज शिरभाते यांच्या संगनमतानेच हा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे संबधीत विभागाने या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून कंत्राटदार फिरोज शेख यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी पळसगाव वाशीयांनी केली आहे.                                ज्याचा कडे शेती आहे, तोच आता या शेतकऱ्याची व्यथा समजु शकतो आणि यावर बोलू शकतो. बैलाला वाचविण्यासाठी या शेतकऱ्याची तळमळ बघून मन सुन्न झाले होते. पोटच्या मुलाप्रमाणे बैलांचा सांभाळ करणाऱ्या शेतकऱ्यावर आज ग्राम पंचायत पळसगाव व कंत्राटदाराच्या भ्रष्ट कारभार व निकृष्ट दर्जाच्या कामामुळे शेतकरी विठ्ठल बजाईत यांच्यावर ही परिस्थिती ओढवली असून गावासाठी खुप शर्मेची बाब आहे. या निकृष्ट बांधकामाची सखोल चौकशी करून ग्रामसेवक, अभियंता व कंत्राटदारावर संबधीत विभागाने कारवाई करावी.                       (शुभम वावरे युवक पळसगाव,बाई)   पळसगाव (बाई) येथे आज रोजी झालेल्या घटनेबाबत तसेच या भ्रष्ट कारभाराबाबत अभियंता धीरज सरदार व ग्रामसेवक धीरज शिरभाते यांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी त्यांच्या मोबाईलवर क्रमांकावर चारदा संपर्क केला. परंतु, त्यांचा फोन बंद दाखवत होता. त्यामुळे बातमी लिहल्याजाई पर्यंत त्यांचे मत जाणून घेता आले नाही.

दिनेश घोडमारे साहसिक news -/24 सिंदी रेल्वे 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!