मृतक रोहन सुनील सूर्यवंशी वय २८ वर्षे रा.टाकळघाटमृत्यूबाबत संशय, टाकळघाट-कान्होलीबारा रोडवरील घटना.
सेलू,टाकळघाट-/ हिंगणा तालुक्यातील टाकळघाट-कान्होलीबारा रोडवरील रिलायन्स रेल्वेलाइनच्या खाली गुरुवारी २७ जून रोजी सकाळी तरुणाचा मृतदेह आढळून आला.तसेच शरीरावर कुठल्याही जखमा नसल्याने त्याच्या मृत्यूबाबत संशय निर्माण झाला आहे.रोहन सुनील सूर्यवंशी वय २८,वर्ष रा. टाकळघाट, ता. हिंगणा असे मृतकाचे नाव आहे.रोहन हा सट्टापट्टी लिहिण्याचे काम करायचा.तो बुधवारी २६ जून रोजी रात्री १० वाजेपर्यंत त्याच्या मित्रांसोबत होता. त्यानंतर गुरुवारी सकाळी त्याचा मृतदेह आढळून आला.व रोहन चे सर्व मित्रांसोबत चांगले संबंध होते. शिवाय,त्याला कोणत्याही समस्या अथवा त्रास नव्हता.त्यामुळे तो आत्महत्या करू शकत नाही, अशी माहिती त्याच्या निकटवर्तीयांनी दिली.
तसेच त्याचा मृतदेह पुलाच्या खाली आढळून आला असून, पुलाची उंची किमान ७० फूट आहे.या पुलावरून उडी मारल्यास अथवा कोसळल्या शरीराला जखमा होणे स्वाभाविक
आहे.मात्र,रोहनच्या शरीरावर कुठल्याही जखमा आढळून आल्या नाहीत.त्यामुळे त्याच्या मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे.मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नागपूर शहरातील मेडिकल हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला. त्याच्या मृत्यूचे कारण पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये स्पष्ट होणार असल्याचे ठाणेदार राजीव कर्मलवार यांनी सांगितले. याप्रकरणी एम आय डीसी बुटीबोरी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, तपास सहायक पोलिस निरीक्षक सुमंतराज भुजबळ करीत आहेत.