🔥वायगाव निपाणी चौफुलीवर झाला अपघात,मात्र ट्रक पसार…
देवळी -/ देवळी पासून १२ किमी अंतरावर वायगाव निपाणी चौफुलीवर वायगाव बस स्थानकावरून ऑटो वर्धेकडे प्रवासी घेऊन जात असताना ऑटो क्रमांक एम एच बी २७९० तर हिंगणघाट कडून देवळीकडे येणारा ट्रक क्रमांक एम एच ३२ क्यू १७७३ या ट्रक चालकाने निष्काळजीपणाने ऑटोला ला धडक देऊन यामध्ये ऑटो मध्ये असलेले तीन प्रवासी गंभीरित्या जखमी झाले.यामध्ये अमोल दांडगे वय ३५ वर्ष,तनु प्रजापती वय १८ वर्ष हे दोन्ही राहणार वायगाव निपाणी तर शालुबाई बारदमवार वय ४५ वर्ष राहणार शिरसगाव धनाडे हे तीन प्रवासी गंभीरित्या जखमी झाले. अपघात होतातच ट्रक चालक पासर झाल्याचे समजते जखमी रुग्णांना वर्धा जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले आहे सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहे.देवळी पोलिसांनी गुन्ह्याची नोंद करून देवळीचे ठाणेदार सार्थक नेहाते यांच्या मार्गदर्शनास गणेश वैद्य व इतर पोलीस कर्मचारी करीत आहे.