गावालगतच पट्टेदार वाघाचा मुक्तसंचार;ग्रामस्थ दहशतीत….

0

🔥चंडीका देवस्थानावर पट्टेदार वाघाचा दोन दिवस ठीय्या.   

🔥तारासावंगा परिसरात एकाच रात्री दोन‌ ठीकनी वाघाच्या हल्याच्या घटना.

आष्टी शहीद -/ तारासावंगा येथील चंडीका माता देवस्थान टेकडी जंगल परिसरात पट्टेदार वाघाची चांगलीच दहशत पसरली आहे.गावालगतच असलेल्या चंडिका माता देवस्थान परिसरात शेत शिवारातील शेतकरी गजानन कडू यांच्या शेतातील गोठ्यातून नऊ महिन्यांच्या पहाटेच्या सुमारास वासराला वाघाने गोठ्यातून उचलून नेले.परंतुु, वासराला जंगलात वाघाने कुठे नेले हे मात्र कळू शकले नाही. ८ दिवसांपूर्वी याच देवस्थान टेकडीवरच वाघाने जंगली प्राणी रोह्यावर हल्ला चढवत गतप्राण केले होते.यामुळे मंदीर परिसरात व संपुर्ण गावभर वाघाची दहशत पसरली आहे.यामुळे ऐन खरीप हंगामात पेरणीच्या तोंडावर वाघाची दहशत शेतकर्यांच्या चिंतेत भर पाडणारी आहे. तारासावंगासह परिसरातील माणिकवाडा,वाडेगाव चिचकुंभ,पेठ,माणिकवाडा व सालोरा या शेतशिवारात पट्टेदार व बिबट वाघाचा मुक्तसंचार होत आहे.शेतकरी गजानन कडू यांचे शेत चंडीका देवस्थानला लागुनच आहे.शेतकरी कडू त्यांचे गाई व वासरू व बैलांना शेतातील गोठ्यातच बांधून ठेवतात.गोठ्याला मजबूत दरवाजा देखील आहे‌.परंतु,वाघाने चक्क गोठ्यातूनच वासराला नेले.त्यामुळे शेतकरी गजानन कडू यांनी सर्वत्र वासराची शोधाशोध केली परंतु,वासरु मात्र कुठे सापडलेच नाही.त्यामुळे वाघाने वासराला दूर कुठे जंगलात नेत गतप्राण केले असल्याचे शक्यता आहे. याबाबत कडू यांनी वन विभागाला कळवले असता व वनविभागाचे अधिकारी महिला वनरक्षक काळे व धुर्वे यांनी घटनास्थळ गाठून शेतकऱ्यांकडून माहिती जाणून घेतली. परंतु,वासरू गत प्राण झाल्याचे अवशेष मिळाले नसल्याने पंचनामा करता येऊ शकला नाही.तर त्याच रात्री शेतकरी ज्ञानेश्वर ठोंबरे यांच्या मौजा पेठ येथील शेतीमधील गोठ्यात बांधून असलेल्या बैलांवर पट्टेदार वाघाने हल्ला चढवीला परंतु,ठोंबरे यांच्या शेतीच्या बाजूलाच शेतीच्या रात्री १० वाजता रखवाली करीता जात असलेल्या एका शेतकऱ्याने हा प्रकार बघितला असतास आरडाओरडा केला यामुळे,वाघाने तेथून पळ काढला याबाबत लगेच शेतकऱ्याने बैल मालकाला कळविले व शेतकरी ठोंबरे हे शेतात पोहोचले तर बघितले असता बैलाच्या अंगावर पट्टेदार वाघाचे नख ओरबडल्याचे दिसले.याबाबत संपूर्ण माहिती शेतकरी ठोंबरे यांनी वन विभागाला दिली.विशेष म्हणजे तारासावंगा माणिकवाडा,वाडेगाव व सालोरा या भागात अनेक दिवसांपासून पट्टेदार व बिबट वाघांचे गेल्या अनेक वर्षांपासून हल्ले सुरू असून,अनेक वासरांना,गायी,बैल,म्हैस आदींना गतप्राण केल्याच्या घटना घडतच आहे. ही प्रकरणे दिवसेंदिवस वाढतच आहे.व परत एकदा हाच प्रकार ऐन पेरणीच्या तोंडावरच पुन्हा घडल्याने शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडली आहे.यामुळे नुकसानग्रस्त पशुपालकांना शासकीय मदत देत वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांची आहे.या दोन्ही घटनेबाबत वनविभागाच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली असता माणिकवाडा येथील राऊंड ऑफिसर धुर्वे व महिला वनरक्षक काळे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठत घडलेला प्रकार जाणून घेतला.व योग्य मार्गदर्शक सुचना शेतकर्यांना केल्या.

नरेश भार्गव साहसिक news -/24 आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!