पहिल्याच दिवशी पाच किलोमीटर अंतर पायी चालत जावं लागले शाळेत….

0

बांबरडा गावात बस फेरी आलीच नाही.

आष्टी शहीद -/ तालुक्यातील बांबरडा गावातील शालेय विध्यार्थी यांना शाळेत जाण्यासाठी बस फेरी न आल्याने पाच किलोमीटर पायी चालत आष्टी येथील शाळेत जावे लागली ही घटना दि.१जुलै रोजी घडली. शालेय विध्यार्थी यांना पहिल्या दिवशी नानाविध संकटाणा सामोरे जावे लागले.
सविस्तर असें कि,
आष्टी तालुक्यातील बारा किलोमीटर अंतरावर असलेल्या बांबरडा गावात बसफेरी सुरु झाली नाही. शाळेचा पहिला दिवस असताना विध्यार्थी शाळेत जाण्यासाठी मोठे उत्सहात असतात. शाळेचा पहिला दिवस असल्यामुळे शालेय मुले बस ची वाट पाहत होते. वाट पाहुण झाल्यावर बस आली नाही असें असताना मुला मुलींना पायपीट करित चामला, थार यां गावापर्यत जावं लागलं. तेथे गेल्यावर त्या मार्गांवर बस फेरी उपलब्ध झाली नाही. एकूणच सर्वच विध्यर्थ्याना खाजगी वाहणातून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागला. स्वातंरायची पंचायहत्तर वर्ष लोटली तरी आजही यां मार्गांवर बसफेऱ्या विलंबने सुरु होतात. असा प्रकार नित्याचाच आहे. पायपीट थांबावी म्हणून बस फेऱ्या नियमित सुरु कराव्या अशी मागणी पालकांनी केली आहे.

नरेश भार्गव साहसिक news -/24 आष्टी शहीद 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!