आष्टी,साहुर,-/ १७ जुलै रोजी आषाढी एकादशी व मोहरम या दोन समाजातील सणांचा योग साधून जनशक्ती संघटना आष्टी तालुका यांच्याकडून मुकेश देशमुख संस्थापक अध्यक्ष जनशक्ती संघटना आष्टी यांच्या नेतृत्वात सामाजिक एकोपा जोपासून जनशक्ती संघटना व हुतात्मा राष्ट्रीय इंग्लिश मीडियम स्कूल आष्टी यांच्या संयुक्त विद्यमाने आषाढी एकादशी निमित्त वृक्षदिंडी व वृक्षरोपण करण्यात आले.तसेच संघटनेतर्फे विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.व मुस्लिम समाजाचा प्रचलित सण मोहरम निमित्य आष्टी शहर व पेठ अहमदपूर येथे जनशक्ती संघटने कडून मुस्लिम बांधवांना शरबतचे वाटप करण्यात आले शरबत वाटप व वृक्षदिंडी कार्यक्रमात हिंदू मुस्लिम बांधवांचा एकोपा दिसून आला. यावेळी वरील कार्यक्रमास युसुफ सरपंच ग्रा.पं. पेठ अहमदपूर,जाकीर हुसेन उपाध्यक्ष न.प.आष्टी,राजा मदनकर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व माजी जि.प.सदस्य,भरत वंझारा अध्यक्ष हु. रा. वि. आष्टी, बालपांडे प्राचार्य हु. रा. वि. आष्टी, शारदा ढोले मुख्यध्यापिका हुतात्मा इंग्लिश मीडियम स्कूल,संजय जाणे,आनंद निंबेकर,विजय गंजीवाले,विजय जाणे, रशीद खान,नासिर शेख,रामकृष्ण सुरजुसे,शरीफ अहमद,राजू सय्यद, पवन गुल्हाने,चंदू सत्पाळ,कार्तिक बोंडे,विक्की माहूरे,सोहेल खान,चंदू आष्टणकर,सागर शिनकर,सादिक खान,वैभव चातुरकर,वैभव मेंढे,प्रकाश श्रीरामे, दिनेश ढोके, राहुल सावरकर, तौसीफ काजी, सचिन जयवंतकार, शरद भोंडे, प्रीतम सरोदे व तसेच हुतात्मा शाळेचे शिक्षक वृंद,आष्टी शहरातील व्यापारी वर्ग,आष्टी शहरातील नागरिक व जनशक्ती संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.