अँड.अमोल बावणे यांची महाराष्ट्र मत्स्य उद्योग विकास धोरण समिती मध्ये निवड….

0

चंद्रपूर -/ विदर्भातील भोई समाजाचे नेते अँड.अमोल बावणे प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय भोई समाज क्रांती दल महाराष्ट्र यांची महाराष्ट्र शासन मत्स्य उद्योग विकास धोरण समिती च्या सदस्य पदी नेमणूक करण्यात आली आहे.अँड.अमोल बावणे हे भोई समाजाचे नेते असून त्यांनी मागील १० वर्षा पासून सतत मच्छिमार समाजाच्या हितासाठी अनेक उपोषणे आंदोलणे करून मच्छिमार समाजाला न्याय मिळून देण्याकरिता प्रयत्न केले त्यांनी विदर्भातील मच्छिमार समाजाचे संघटन वाढण्याकरिता तसेच समाजाला राजकीय प्रवाहात आणून त्यांना न्याय मिळवून देण्याकरिता ते नेहमी प्रयत्नशील असतात त्यांनी मच्छिमार समाजाचे राजकीय ने्तृत्व निर्माण करण्याकरिता वरोरा भद्रावती विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढविली त्यांना चांगले यश मिळाले. मच्छिमार समाजाचे प्रश्न त्यांच्या विकसाचे ध्येय धोरण ते आता महाराष्ट्र शासन मत्स्य उद्योग विकास धोरण समितीला देऊन मच्छिमार यांच्या विकासासाठी ते प्रश्न मांडतील. अँड.अमोल बावणे हे या माध्यमातून ते समाजाला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करतील.अँड अमोल बावणे यांच्या नियुक्ती मुळे चंद्रपूर जिल्हा व विदर्भातील मच्छिमार समाज व इतरांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. अँड.अमोल बावणे यांची नियुक्ती झाल्याबद्दल कार्यकर्त्यांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

साहसिक news -/24 वर्धा 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You may have missed

error: Content is protected !!