सूविधाचा अभाव ग्राहकांना नाहक त्रास,एक बॅक पाहते विस गावाचा कार्यभार….

0

🔥विद्यार्थी, शेतकरी ,निराधार सर्व परेशान. 

🔥बॅंक मंध्ये लिंक नसने झाले निंत्याचे. 

🔥केवाय सी चे पर्चे भरून ही बॅंक पैसे देत नाही.                                 

🔥केवाय सी करून सुद्धा बॅंक देते १५ ते २० दिवसांनी पैसे.                                                                      🔥बँक समोरील राहते वाहने उभी, पार्किंग सुविधा नाही,पिण्याचे पाणी नाही,स्वच्छता गृह नाही.                 

🔥भिडी येथे  दुसरी शासकीय बँकची मागणी.

भिडी -/ येथिल एकच बॅंक ऑफ इंडिया असल्याने या बॅंकेत या परीसरातिल १५ ते २० ग्राम खेड्यांचा देवान घेवान चा व्यवहार नियमित सूरू असतो यामंध्‍ये या बॅंक चे लिंक जाणे हे नित्याचेच ठरले आहे बॅंक मध्ये तिन ते चार तास पर्यंत उभे राहावे लागतात सूविधाचा अभाव,व अनेक समस्यांनी त्रस्त ग्राहक बॅंकच्या अडेलतंटू धोरणाने त्रस्त झाले आहेत.भिडी हे पांच हजार लोकवस्तिचे गाव येथे ग्रामिण रूग्णालय,शाळा,विद्यालय, महाविद्यालय,बंद पोलिस चौकी व असे अनेक शासकीय कार्यालय आहे व भिडी हे या परीसरातील १५ ते २० ग्राम खेड्यांचे दळणवळण केंन्द आहे.
येथे एकच बॅंक ऑफ इंडिया ही शाखा असल्याने येथील बॅंकेत दहा वाजेपासून च ग्राहकांच्या बॅंक सामोर रांगा लागल्या जातात एकच बॅंक असल्याने या बॅंकेत शेतकरी, विद्यार्थी,निराधार,शासकीय कार्यालय कर्मचारी,व त्यातही महिला बचत गटांच्या महिलांचा मोठ्या प्रमाणात वावर असतो.या बॅंकच्या देवानं घेवान बूथ एकच असल्याने या.बूथ जवळ महीला व पूरूषाची एकत्रित भीड दिसून येते या बॅंक मध्ये महीलांचे बूथ वेगळा करायला पाहीजेत याकडे मात्र बॅंक व्यवस्थापक दूर्लक्ष करीत आहे. पिण्याचे पाणी नाही,ग्राहकांना स्वच्छता गृह नाही,बॅंकेत व्यवहाराकरीता तासनतास बॅंकच्या बाहेर थांबावे लागते या मध्ये महीलांची फार दयणिय अवस्था होत आहे.
येथिल बॅंकची लिंक जाने हे नित्याचेच ठरले आहे त्यामूळे बाहेर गावातिल २० ते २५ कि.मी.अंतरावरील येना-या शेतकरी,निराधार,शालेय विद्यार्थीनी,वद्यार्थी,यांना कोणतेही व्यवहार न करता आल्या पावलांनी परत पाठविले जातात यात कोणाला पैश्याची अंत्यंत गरज असतात पन आपलाच पैसा आपल्याला वेळेवर मिळत नसल्याची खंत ग्राहकांना वाटत आहे.केवायसी केल्या शिवाय बॅंक मध्ये व्यवहार करता येत नाही खाते बॅंकनी गोठूण ठेवले आहे त्यातही केवायसी पर्ची भरूनही सात ते आठ दिवसांचा कालावधी लोटूनही बॅंक खाते खोलले नाही बॅंकेवाले म्हणतात याला पंधरा दिवसांचा कालावधी लागतो त्यामूळे बाहेरील व्यवहार कसा करावा असा ?प्रश्न बॅंक खातेदारांना पडला आहे तसेच भिडी येथे एकच बॅंक असल्याने व बॅंकेत असलेल्या असूविधाने ग्राहक त्रस्त झाले आहे याकडे संबंधित अधिका-यांनी तातडीने लक्ष द्यावे अशी मागणी जोर धरत आहे
( भिडी येथे त्वरीत दूसरी बॅंक द्यावी )
भिडी हे पांच हजार लोकवस्तिचे गाव येथे अणेक प्रशासकीय कार्यालये आहेत त्यात ही १५ ते २० खेडे ग्राम खेड्यांचे दळणवळण केंन्द भिडीच आहे येथे एकच बॅंक असल्याने देवानं घेवान व्यवहाराकरीता ग्राहकांना नाहक त्राससहण करावा लागत असल्याने येथे लवकरात लवकर दूस-या शासकीय बॅंकची मागणी जोर धरत आहे.येथे दूसरी बॅंक त्वरीत यावी या करीता सामाजीक कार्यकर्ते सूनिल चोरे,माजी सरपंच डॉ प्रकाश काळे, सचिन बिरे,नितीन दिघाडे,जयवंत डफळे,मणिस खडसे,नितीन चौधरी,मणीस हांडे व सामाजिक संघटणांनी केली आहे.

राजू वाटाणे साहसिक news -/24 भिडी 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!