वर्धा -/येथील फुले,शाहू आंबेडकर चळवळी चे खंदे सामाजिक कार्यकर्ते सुनील वनकर यांच्या वाढदिवसा निमित्त २५ जुलै रोजी सकाळी ८ वाजता मसाळा येथील निवास्थानी वृक्ष प्रेमी तथा सामाजिक कार्यकर्ते पद्माकर कांबळे व समाज सेवक भानुदास पाटील यांच्या हस्ते वृक्ष भेट देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी त्यांनी तथागत बुद्ध विहार मसाळा येथे पद्माकर कांबळे व भानुदास पाटील,सुनील वनकर यांच्या हस्ते वृक्ष लागवड करून पुढील वाटचाली करीता हार्दिक शुभेच्छा देऊन वृक्ष लागवड करण्यात आली.यावेळी वॉर्डातील बुद्ध उपासक उपस्थित होते.