वर्धा -/ वर्धा जिल्ह्यात एक नवीन चित्रपट निर्मिती सुरू होणार आहे, ज्याची संपूर्ण कथा ग्रामीण भागातील एका मुलीच्या संघर्षावर आधारित आहे.शिक्षण घेण्याची तीव्र इच्छा असलेल्या या मुलीच्या कहाणीला केंद्रस्थानी ठेवून हा चित्रपट तयार केला जात आहे.या चित्रपटाचे शूटिंग ऑक्टोबर महिन्यात सुरू होईल आणि सुमारे २० दिवस चालणार आहे.दिग्दर्शक आदेश ढगे यांनी या प्रकल्पाची भूमिका स्पष्ट केली आणि स्थानिक कलाकारांना या प्रक्रियेत कशा प्रकारे सहभागी करता येईल याचे विस्तृत वर्णन केले. त्यांचं म्हणणं आहे की, “आम्ही या प्रकल्पात स्थानिक कलाकारांचा मोठा सहभाग अपेक्षित आहे. हे कलाकार आपल्या स्थानिक संस्कृतीचे प्रतिनिधित्व करतील आणि त्यांना मोठ्या प्रमाणात व्यावसायिक अनुभव मिळवण्याची संधी मिळेल.संपूर्ण प्रकल्पामुळे स्थानिक कलाकारांना नवा व्यासपीठ मिळवण्याची आणि त्यांच्या कलेला योग्य मान्यता प्राप्त होण्याची आशा आहे.दिग्दर्शकांनी तसेच युवकांना त्यांच्या कला आणि कौशल्यांची सर्वोत्तम प्रकारे मांडणी करण्याचे आणि या प्रकल्पात पूर्ण योगदान देण्याचे आवाहन केले.