वर्धातील सर्वात मोठी धक्कादायक घटना: सावंगी मेघे येथील सरस्वती वस्तीगृहातील विद्यार्थ्यांच्या जेवणात आणि नाश्त्यात अळ्या
शहर प्रतिनिधी / वर्धा :
विद्यार्थ्यांना निकृष्ट जेवण देण्यात येत असल्याची धक्कादायक बाब सावंगी मेघे येथील सरस्वती वस्तीगृहात पुढे आली आहे. निकृष्ट जेवणामुळे विद्यार्थ्यावर उपाशी राहण्याची वेळ आली आहे.आता तर विद्यार्थ्यांच्या जेवणात सापडल्याने संताप व्यक्त होत आहे. जिल्ह्यातील सावंगी मेघे येथील सरस्वती मुलीच्या वस्तीगृहात हा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. दररोज जेवणात अळ्या सापडल्या असल्याने विद्यार्थ्यांना उपाशी राहावे लागत आहे.. निकृष्ट जेवण मिळत असल्याने नाराजी व्यक्त होत होती मात्र, त्याकडे दुर्लक्ष करण्यात येत होते. आता तर एक दिवसानंतर जेवणात अळ्या निघत असल्याने वस्तीगृहातील विद्यार्थ्यांमधून संताप व्यक्त होत आहे. अशा निकृष्ट जेवणामुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात येऊ शकते, याला जबाबदार कोण? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. दरम्यान हा सगळा प्रकार गेल्या काही महिन्यांपासून सुरू असल्याची विद्यार्थ्यांची तक्रार आहे. मेस व्यवस्थापनाकडे तक्रार केल्यानंतर याबाबत कोणतीही संबंधितांवर कारवाई करण्यात आली नाही. यामुळे विद्यार्थी संताप झाले आहेत. एनएमएन, जीएमन आणि फार्मसीचे शिक्षण घेणारे शेकडो विद्यार्थी आहेत. सावंगी मेघे येथील सरस्वती वस्तीगृहात विदर्भातून शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी येतात 6450 रुपये प्रति महिना जेवणाचा खर्च होतो तसेच सोयी-सुविधांच्या नावा विद्यार्थ्यांना जेवणात आणि नाश्त्यात अळ्या मिळत असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.